मुंबई : तुम्ही तुमच्या मुलाशी ज्या प्रकारे संवाद साधता आणि तुम्ही त्यांना कसे शिस्त लावता त्याचा परिणाम आयुष्यभर त्यांच्यावर राहतो. संशोधकांनी पालकत्वाचे चार मुख्य प्रकार सांगितले आहेत. त्यात हुकूमशाही करणारे पालक, बिनधास्त पालक, मुलांच्या प्रत्येक गोष्टीत सहाभागी होणारे पालक आहेत. आज आपण हुकूमशाही पालकत्वाबाबत ( Authoritarian parenting ) जाणून घेणार आहोत. प्रत्येक पालकाचा मुलांचे संगोपन करण्यासाठी भिन्न दृष्टीकोन असतो. लोक सहसा कोणती पालक शैली चांगली आहे हे जाणून घेण्यासाठी इच्छूक असतात.
हुकूमशाही पालकत्व : हुकूमशाही पालकत्वात तुमचा विश्वास असतो की तुमचे मुल तुमचे सगळ एकतो. किंबहूना त्याने ऐकले पाहिजे इतर कोणाचेही ऐकू नये. नियमांचा विचार करता माझ्या मार्गांवरच त्यांनी चालावे. यात तुम्ही तुमच्या पाल्याच्या भावना विचारात घेत नाहीत. हे तुम्ही हुकूमशाही पालक असल्याचे ठळकपणे सांगते. हुकूमशाही पालकांचा असा विश्वास आहे की मुलांनी नियमांचे पालन केले पाहिजे.
रागावणे, ओरडणे : हुकूमशही पालक जेव्हा एखादे मूल एखाद्या नियमामागील कारणांवर प्रश्न विचारतात तेव्हा रागावणे, ओरडणे, मारणे असे प्रकार होतात. त्यांना पाल्यांना समजावून सांगण्यात रस नसतो. त्यांचे लक्ष आज्ञाधारकतेवर असते. ते मुलांच्या समस्या सोडवण्यामध्ये किंवा अडथळ्यांमध्ये सामील होत नाहीत. त्याऐवजी, ते नियम बनवतात आणि मुलाच्या मताकडे दुर्लक्ष करतात.
शिस्तीऐवजी शिक्षा वापरतात : हुकूमशाही पालक शिस्तीऐवजी शिक्षा वापरतात. त्यामुळे, मुलाला चांगल्या निवडी कशा करायच्या हे शिकवण्याऐवजी, ते मुलांना त्यांच्या चुकांसाठी दिलगीर वाटण्यात गुंतवतात. कठोर हुकूमशाही पालकांसह वाढणारी मुले बहुतेक वेळा नियमांचे पालन करतात. मात्र, पालकांवर प्रेम करण्याऐवजी रागराग करतात. हुकूमशाही पालकत्वाचा वाईट परिणाम ( Authoritarian parenting negative impact ) पाल्यांवर जाणवतो.
स्वाभिमानाच्या समस्या : हुकूमशाही पालकत्वाचा मुलांच्या जीवनावर परिणाम जाणवतो. हुकूमशाही पालकांच्या पाल्यांमध्ये स्वाभिमानाच्या समस्या विकसित होण्याचा धोका जास्त ( Authoritarian parenting negative impact ) असतो. कारण पालकांच्यासमोर त्यांच्या मतांची किंमत नसते. त्यावळी ते विरोधक किंवा आक्रमक देखील होऊ शकतात. भविष्यात चांगल्या गोष्टी कशा करायच्या याचा विचार करण्याऐवजी, ते सहसा पालकांच्या अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांवर किंवा स्वतःबद्दल वाटणाऱ्या रागावर लक्ष केंद्रित करतात.