मुंबई : राज्यात औरंगजेब पुन्हा अवतरु लागला आहे. आता नवी मुंबईमधील एका व्यक्तीने सोशल मीडियावर औरंगजेबचा प्रोफाईल ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रोफाईल ठेवल्यानंतर एका हिंदू संघटनेने हा मुद्दा उपस्थित केला त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.
पुन्हा अवतरला औरंगजेब : गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेब पुन्हा एकदा आधुनिक पद्धतीने सर्वांसमोर येत आहे. यामुळे राज्यातील शांतेतचे वातावरण बिघडू लागले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरमधील एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर औरंगजेब यांच्या फोटो स्टेट्स म्हणून ठेवला होता. त्यानंतर कोल्हापुरात हिंदू संघटनांनी निषेध मोर्चा काढला त्याला हिंसक वळण लागले होते. कोल्हापूर शहरात बुधवारी काही स्थानिकांनी टिपू सुलतानच्या प्रतिमेसह आक्षेपार्ह ऑडिओ संदेश सोशल मीडिया स्टेटस म्हणून लावला होता. त्याविरोधातील निदर्शनादरम्यान आंदोलकांनी दगडफेक केली होती. यापूर्वी अहमदनगरमध्ये मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो लावण्यात आले होते. संगमनेर शहरात एका मुलाच्या कथित हत्येच्या प्रत्युत्तरात सकल हिंदू समाजाच्या मोर्चात दगडफेक करण्यात आली. यात दोन जण जखमी झाले असून पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. संगमनेरमध्येही धार्मिक मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा देत औरंगजेबाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले होते. आता पुन्हा नवी मुंबईतील एका व्यक्तीने औरंगजेब याचा फोटो प्रोफाईलला ठेवला. त्याप्ररकणी हिंदू संघटनांनी आक्षेप घेत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसात तक्रार केली.
गुन्हा दाखल : पोलिसांनी वाशी येथील एका मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडरच्या आऊटलेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या व्यक्तीला पोलिसांनी त्याला नोटीस बजावत जाण्याची परवानगी दिली. हिंदू संघटनांनी औरंगजेबाच्या प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट पोलिसांना सादर केला होता, ज्यामुळे कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील पुढील तपास सुरू केला असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा