ETV Bharat / state

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत इनकमिंग सुरू

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीधर्माच्या विरोधात काम करायला सांगितले होते, ते आम्हाला पटलं नसल्याचे तनवाणी आणि बरवाल म्हणाले. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन, अनेक भाजपचे आजी- माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले.

Aurangabad Municipal Election
शिवसेनेत इन्कमिंग सुरू
author img

By

Published : Feb 19, 2020, 7:31 PM IST

मुंबई - औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली आहे. भाजपचे अनेकजण शिवसेनेत प्रवेश करत आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, माजी महापौर गजानन बरवाल, भाजपचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत घरवापसी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज (बुधवार) मातोश्रीवर शिवबंधन बांधून त्यांनी पक्षप्रवेश केला.

हेही वाचा - 'झाडा'झडती..! वनमंत्र्यांनी दिले मुनगंटीवारांच्या चौकशीचे आदेश

हेही वाचा -इतके वर्षे दूर राहून वाया घालवली....उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत इन्कमिंग सुरू

तनवाणी आणि बरवाल यांच्या शिवसेना प्रवेशावेळी मराठवाड्यातील शिवसेना आमदार संजय शिरसाठ आणि अंबादास दानवे हे सुद्धा उपस्थित होते. स्थानिक भाजपमधल्या राजकारणाला आणि कार्यपद्धतीला कंटाळलो आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीधर्माच्या विरोधात काम करायला सांगितले होते, ते आम्हाला पटलं नसल्याचे तनवाणी आणि बरवाल म्हणाले. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन, अनेक भाजपचे आजी- माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही ते म्हणाले. लवकरच आणखी काही जणांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.