ETV Bharat / state

Atul Londhe On DCM विशेष पोलीस आयुक्तांवरुन रणकंदन: समांतर प्रशासन चालवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न, अतुल लोंढेंचा आरोप - पोलीस दलात मोडतोड

देवेंद्र फडणवीस ( Atul Londhe Criticize To Devendra Fadnavis ) यांनी पोलीस अधिकारी देवेन भारती ( Deven Bharti Appointed Special Commissioner Of Police ) यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नेमणूक केली आहे. त्यांच्या या नेमणुकीवरुन आता रणकंदन सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समांतर यंत्रणा उभी करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Leader Atul Londhe ) यांनी केला आहे.

Atul Londhe Criticize To Devendra Fadnavis
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 4, 2023, 8:16 PM IST

प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे

मुंबई - पोलीस दलात आयुक्त पद सर्वोच्च असताना विशेष पोलीस आयुक्त ( Commissioner Of Police In Mumbai ) नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी शिस्तीचा प्रशासकीय विभाग असलेल्या पोलीस दलात मोडतोड करून विशेष पोलीस आयुक्त ( Deven Bharti Appointed Special Commissioner Of Police ) नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणूक करून देवेंद्र फडणवीस ( Atul Londhe Criticize To Devendra Fadnavis ) हे समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress Leader Atul Londhe ) यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्रीपद भूषवणे रुचले नाही पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवणे रुचले नाही. सत्ता स्थापन होताच त्यांनी लगेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दर्जा बरोबर करण्यासाठी दोन वेगळ्या वॉर रुम काढल्या. आता शिस्तीचे खाते असलेल्या पोलीस विभागाचे एक प्रकारे विभाजन करण्याचे काम सुरु केल्याचा हल्लाबोलही अतुल लोंढे यांनी केला आहे.

पोलीस आयुक्त बदलता येत नाहीत मुंबईचे पोलीस आयुक्त ( Commissioner Of Police In Mumbai ) बदलता येत नाहीत. काहीतरी अडचणी असतील म्हणून विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करून देवेन भारती यांची त्यावर नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीमुळे पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांचा तर विशेष पोलीस आयुक्त उपमुख्यमंत्र्यांचा असा संदेश गेला आहे. आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी प्रशासनाची अशी मोडतोड करण्यात आली आहे. असेच असेल तर आता प्रत्येक जिल्ह्यालाही विशेष जिल्हाधिकारी, विशेष जिल्हा पोलीस अधिक्षक, विशेष तहसिलदार, विशेष नायब तहसिलदार अशी वरपासून खालीपर्यंत विशेष पदांची निर्मिती करून दोन सत्ता केंद्रे तयार करा, एक शिंदे गट आणि दुसरे भाजपाला असे वाटून घ्या व प्रशासकीय यंत्रणेचा बट्टयाबोळ करा खोचक सल्ला लोंढे यांनी दिला.

शिंदे-फडणवीस स्थगिती सरकार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रशासकीय स्तरावर कोणतेही काम होत नाही. हे स्थगिती सरकार झाले आहे. समांतर यंत्रणा उभी करून महाराष्ट्राचा बट्याबोळ करण्याचे काम केले जात आहे. हे आम्हाला मान्य नाही व योग्यही नाही, असेही लोंढे यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.