मुंबई- महाविकासआघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार सकाळी 11 वाजता विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र, सरकासक 100 दिवस टिकले हीच मोठी गोष्ट आहे, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखलकर यांनी केली. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत करावी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना धोका दिला आहे. त्यामुळे आज मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये तरी सरकार शेतकऱ्यांसाठी काही तरतूद करेल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे अतुल भातखलकर म्हणाले.
हेही वाचा- मुंबईत ७० हजार प्रवांशांची कोरोना चाचणी; ८३ संशयितांपैकी ७५ निगेटिव्ह तर ७ जण अजूनही देखरेखीत
सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीत बांधावर जाऊन पाहणी करावी आणि हेक्टरी 25 हजारांची मदत करावी, असेही भातखलकर म्हणाले.
आर्थिक पाहणी अहवालात राज्यातील नोटबंदीनेच बेरोजगारी वाढली असे दाखवले. मात्र, नोटबंदी तर 2016 झाली. बेराजगारी आता वाढली असून हे सरकार फक्त जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.