मुंबई: पत्रकार परीषदेत बोलताना किरीट सोमैया म्हणाले की रात्री साडेदहा वाजता ७० ते ८० शिवसैनिक गुंडांनी माझ्यावर हल्ला केला. मला केंद्र सरकारने झेड सिक्युरिटी दिली आहे. असे असताना सुद्धा माझ्यावर चप्पल, दगडाने हमला केला गेला. तसेच खार पोलिसांनी खोटा एफआयआर दाखल केला आहे म्हणून मी त्यावर सही केली नाही. ठाकरे सरकार माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी माझ्यावर वाशिम येथे हल्ला झाला, त्यानंतर पुणे महानगरपालिकेमध्ये माझ्यावर हल्ला करण्यात आला. परंतु अद्याप दोषींना शिक्षा झालेली नाही आहे आणि आता काल माझा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहेत, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. याबाबत केंद्रीय गृह सचिवांनी या विषयी चौकशी करायला सांगितल आहे. उद्या भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिव यांना भेटणार आहे. किरीट सोमय्या यांच्या ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की ठाकरे सरकार फक्त हेच करु शकते. माझ्या ड्रायव्हरचा यामध्ये काय संबंध. माझ्यावर हल्ला झाला त्याबाबत कोणाला चिंता नाही. याबाबत कोण दोषी आहे त्यावर गुन्हा नाही, परंतु माझ्या ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करण्याचे घाणेरडे काम हे सरकार करत आहे असेही किरीट सोमय्या म्हणाले.