मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या पक्षाचा पराभव होईल म्हणून घाबरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमित शाह यांच्या रॅलीवर हल्ला केला. हा हल्ला म्हणजे लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले, देशातील लोकशाहीपुढे बंगालचे आव्हान आहे. तिथे इतर पक्षाला प्रचार करु दिला जात नाही. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे. तिथे चांगल्या वातावरणात निवडणुका पार पडाव्यात ही आयोगाची जबाबदारी आहे.
अमित शाह यांच्या रॅलीमध्ये गोंधळ घालण्यात आला. यानंतर पोलिसांचे वर्तन योग्य नव्हते. बंगालमध्ये लोकशाही आहे की, नाही हा प्रश्न आता पडत आहे. जे लोक स्वताला लोकशाहीचे रक्षक म्हणतात. त्यांनी ममता यांना याबाबत जाब विचारावा, असे न केल्यास लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. या हुकुमशाहीला जनताच उत्तर देईल, असेही फडणवीस म्हणाले.