ETV Bharat / state

मुंबई : भाजपा कार्यालयात बोलावून पदाधिकाऱ्याचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

मुंबईच्या बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

mumbai latest news
mumbai latest news
author img

By

Published : Sep 23, 2021, 9:14 AM IST

Updated : Sep 23, 2021, 2:03 PM IST

मुंबई - राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या अनेक घटना वाढत आहेत. त्यात नुकताच मुंबईत साकीनाका परिसरात बलात्काराची घटनाही उघडकीस आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना. मुंबईच्या बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

म्हणून पोलिसांत केली तक्रार -

पक्षात पद देतो, असे सांगून स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रतीक साळवी याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाच - राज्यपाल निभावत आहेत मदमस्त हत्तीचा रोल, शिवसेनेची केंद्र आणि कोश्यारींवर कडाडून टीका

Last Updated : Sep 23, 2021, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.