मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आचारसंहिता लागू झाली आहे. आणि मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. दरम्यान, समतानगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नाका-बंदी दरम्यान एक कोटी रुपयांची बेनामी रक्कम मुंबई पोलिसांनी हस्तगत केली आहे.
हेही वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये ओलीस नागरिकाला सोडवण्यात यश, एका जवानाला वीरमरण
कांदिवली पूर्व येथे ग्रोवेल मॉल जवळ पोलिसांनी लावलेल्या नाका-बंदी दरम्यान एका कारमधून काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली असता टाटा हेक्सा या वाहनांमध्ये काही व्यक्ती पोलिसांना रोख रक्कम नेताना आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी अमित कांतीलाल सेठ (49) या गुजरातच्या व्यावसायिकाला ताब्यात घेतले. आणि त्याच्यासोबत आणखी 9 व्यक्तींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यातील काही गुजरात राज्यातील असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - 'ईडी' चौकशीचा व भाजपचा काही संबंध नाही - चंद्रकांत पाटील
त्याच्या जवळील बॅगेची तपासणी केली असता बॅगेमध्ये 2000 व 500 रुपयांच्या नोटांमध्ये तब्बल एक कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. ही रक्कम मुंबईत कशासाठी आणली होती, याची उत्तर आरोपी योग्य प्रकारे देत नसल्यामुळे पोलिसांनी एकूण सात जणांना ताब्यात घेतले आहे. तर पुढील कारवाई सुरू आहे.