मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकींच्या मतदानप्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहेत. चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्ग वरील मतदान केंद्रावर शेवटच्या काही मिनिटांत मतदारांची गर्दी झाली होती.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. मतदारांचा मुंबई शहर व उपनगरांमध्ये मोठया संख्येने उत्साह दिसून येत होता. पूर्व उपनगरातील चेंबूर परिसरातील पी.एल. लोखंडे मार्ग हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात असल्याने मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. तर, मतदानासाठी आता काही शेवटचे मिनिट बाकी असल्याने मतदार आणखी मोठ्या संख्येने या मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी...
हेही वाचा - कॅप्टन अमोल यादव यांनी सहकुटुंब कांदिवलीत केले मतदान
हेही वाचा - समर्थकांच्या पाठिंब्यामुळे मला विजयाची खात्री - तृप्ती सावंत