ETV Bharat / state

महायुतीतील घटक पक्षात नाराजी; कोणाची मनं झाली 'कडू', कोणी म्हणते कुरबूर नाही - घटक पक्ष नाराज

Assembly Election 2024 : आगामी निवडणुकीत जागा वाटप करताना महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र महायुतीमध्ये कोणतीही कुरबूर नसल्याचं महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडं आमचं महायुतीतील स्थान काय, असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 8:59 AM IST

मुंबई Assembly Election 2024 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार कामाला लागली आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नसून ओढाताण होणार आहे. तर दुसरीकडं महायुतीत सगळेच आलबेल नसल्याचं दिसत आहे. महायुतीतील लहान घटक पक्ष नाराज असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.

Assembly Election 2024
आमदार बच्चू कडू

महायुतीच्या बैठकीत नाराजीचा सूर : आगामी निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी महायुतीच्या वतीनं 3 जानेवारीला पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महायुती जिल्हास्तरीय मेळावा घेऊन आगामी निवडणुकीचा रणशिंग फुंकणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पत्रकार परिषदेत महायुतीतील लहान घटक पक्षांचं कोणीही उपस्थित नसल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्या संदर्भात आम्ही लवकरच बैठक घेत असल्याचं महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी महायुतीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला बच्चू कडू, महादेव जानकर उपस्थित नव्हते. या बैठकीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील लहान घटक पक्ष नाराज असल्याचं समोर आलं. आम्हाला विचारात घेत नसल्याचं 'गाऱ्हाणं' लहान घटक पक्षांनी मांडल्याचं समोर येत आहे.

Assembly Election 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आमचं स्थान काय सांगावं - बच्चू कडू : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी तर उघड उघड आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. आपल्याला शुक्रवारच्या महायुती बैठकीचा निरोप ऐनवेळी आला. बैठकीचा विषय काय असणार हे माहीत नसताना थेट बैठकीला येण्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच बच्चू कडू यांनी भाजपावर देखील टीका केली आहे. सध्या सर्वच लहान घटक पक्ष आपल्या सोबत असल्याचं भाजपा गृहीत धरुण काम करतंय हे चुकीचं असल्याचंही कडू म्हणाले. "आमचा पक्ष लहान असला, तरी महाराष्ट्रात आमचं अस्तित्व असून भाजपानं स्पष्ट केलं पाहिजे की लोकसभा विधानसभा निवडणुकीत आम्हाला किती जागा देणार, आमचं स्थान काय असणार" असा सवाल बच्चू कडू यांनी थेट भाजपाला विचारला आहे.

Assembly Election 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुतीत कोणतीही कुरबूर नाही - संजू भोर पाटील : "महायुतीतील घटक पक्षात कुरबुरी आहेत, असं आम्ही म्हणणार नाही. महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या आपल्या अपेक्षा असतात, विद्यमान लोकप्रतिनिधी असतात, चांगले नेते असतात, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा त्या पक्षाच्या नेतृत्वाला असते. त्या अपेक्षा व्यक्त करणं म्हणजे कुरबूर म्हणता येणार नाही. महायुतीतील सर्वच घटक पक्ष चर्चेतून मार्ग काढू आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचं आणि केंद्रात एनडीएचं सरकार आणू" असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजू भोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Assembly Election 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार

महायुतीत एकमेकाचे डोके फोडतात - अतुल लोंढे : महायुतीत आता लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून एकमेकांचे डोके फोडण्याचं काम सुरू झालं असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केली आहे. "महायुतीमध्ये बच्चू कडू नाराज आहेत, तसेच जागा वाटपावरून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा त्यांच्यात सर्व काही अलबेल असल्याचं दाखवले जात आहे. मात्र दुसरीकडं इंडिया आघाडीमध्ये अलबेल नसल्याचा वारंवार आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. महायुतीत अस्तित्वाची लढाई सुरू आहे. छोटे पक्ष तर कुठे आहेत, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे" टोला अतुल लोंढे यांनी महायुतीला लगावला आहे.

घटक पक्ष सांभाळताना तारेवरची कसरत : "2024 हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांच्या जागा वाटपावरून आपापल्या अपेक्षा असणार आहेत. त्यामुळं महायुतीमध्ये जागा वाटपावरून मतभेद होऊ शकतात. ही नाराजी लवकर शांत झाली नाही, तर याचा फटका निश्चितच महायुतीला बसू शकतो" असा अंदाज राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड यांनी व्यक्त केला. निवडणुका जवळ येतील तसं तसं आघाडी आणि महायुतीत घटक पक्षांमध्ये जागांवर बैठका सुरू होतील. महायुतीचा विचार करता भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत लहान घटक पक्ष जागा वाटपाबाबत कशाप्रकारे समझोता करून महायुती अधिकच घट्ट करण्यास सहकार्य करतात, हे पहावे लागणार आहे. मात्र महायुतीतील लहान घटक पक्षांमधील नाराजी दूर करण्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष यांना तारेवरची कसरत करावी लागणार, हे मात्र निश्चित.

हेही वाचा :

  1. Year Ender २०२३ : महायुती सरकारचे 2023 मधील 'हे' आहेत महत्त्वाचे निर्णय
  2. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज पत्रकार परिषद, जागा वाटपाचा तिढा सुटणार?
  3. "लोकसभेला 45 खासदार तर विधानसभेला 225 जागा जिंकू," चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.