ETV Bharat / state

अस्लम शेख यांची मुंबईच्या डबेवाल्यांना मदत, 2500 रेशन किटचे वाटप - lockdown effect on dabawala

शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना 2500 रेशन किटचे वितरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांधकाम मजूरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी केली.

aslam shaikh distributed ration kit
मुंबईच्या डबेवाल्यांना 2500 रेशन किटचे वाटप
author img

By

Published : Jun 8, 2020, 6:40 PM IST

मुंबई - शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी डबेवाल्यांना 2500 रेशन किटचे वितरण करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या पी-उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लॉकडाऊनमुळे डबेवाल्यांसमोर उभे राहिलेले आर्थिक संकट तसेच भविष्यातील या व्यवसायाशी निगडित आव्हाने व प्रश्न मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष रामदास करोंदे यांनी अस्लम शेख यांच्यासमोर मांडले.

कार्यक्रमास मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे, मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशनच्या अनुशा श्रीनिवासन अय्यर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बांधकाम मजुरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते विनोद शेटे यांनी केली. सोबतच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मूळ निवासी असणाऱ्या डबेवाल्यांना पंचनामे करुन त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणीही यावेळी केली गेली.

डबेवाले हे मुंबईची दुसरी लाईफलाईन आहेत. हे डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे व सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवेर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची व त्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही, शेख यांनी यावेळी दिली. तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पचनामे त्वरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्यची माहिती अस्लम शेख यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.