ETV Bharat / state

Aslam Shaikh : आमदार अस्लम शेख यांना गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी - आमदार अस्लम शेख यांना जीवे मारण्याची धमकी

Aslam Shaikh : राज्यातील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना कुख्यात गॅंगस्टर गोल्डी ब्रारनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गोल्डी ब्रार हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. त्यानं यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Aslam Shaikh
Aslam Shaikh
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 4:23 PM IST

मुंबई Aslam Shaikh : काँग्रेस नेते आणि मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांना गँगस्टर गोल्डी ब्रारकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कॉलरकडून धमकी मिळाल्यानंतर मालाडमधील बांगूर नगर पोलिसांनी एफआयआर नोंदवला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

सलमान खानलाही धमकी दिली होती : अस्लम शेख यांचे स्वीय सहाय्यक आणि वकील विक्रम कपूर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी शेख यांच्या मोबाईलवर एक फोन आला. कॉलरनं स्वत:ची ओळख गोल्डी ब्रार अशी सांगितली आणि शेख यांच्याबद्दल विचारणा केली. गोल्डी ब्रार उर्फ सतींदरजीत सिंग हा फरार कॅनेडियन गुंड असून तो तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. त्यानं यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.

फोन करणाऱ्याचे दोन नंबर पोलिसांकडे जमा केले : एफआयआरनुसार, कपूर यांनी सांगितलं की, कॉलर म्हणाला, 'मैं गोल्डी ब्रार बोल रहा हू. मैं अस्लम शेख को दो दिन मे गोली मारकर उडाने वाला हू. ये अस्लम शेख को बता दो. (मी गोल्डी ब्रार बोलत आहेत. मी अस्लम शेखला दोन दिवसांत गोळ्या घालणार आहे. हे अस्लम शेखला सांगा) तक्रारदारानं फोन करणाऱ्याचे दोन नंबर पोलिसांकडे जमा केले आहेत.

बांगूर नगर पोलिसांनी एफआयआर नोंदवला : वकील विक्रम कपूर यांच्या तक्रारीनंतर बांगूर नगर पोलिसांनी दोन मोबाइल नंबरच्या नोंदणीकृत वापरकर्त्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) आणि ५०७ अंतर्गत एफआयआर नोंदवला. पोलिसांनी फोन नंबरची सेवा देणाऱ्या कंपनीला पत्र लिहून यासंदर्भात तपशील गोळा करणं सुरू केलं आहे.

हेही वाचा :

  1. Honey Singh Death Threat : हनी सिंगला जीवे मारण्याची धमकी, गोल्डी ब्रारने पाठवली व्हॉईस नोट
  2. Sanjay Raut Threat Case : YouTube वर लॉरेन्सचे व्हिडिओ पाहिले अन् दिली संजय राऊतांना धमकी; आरोपी होता दारुच्या नशेत, पोलिसांची माहिती
  3. Lawrence Bishnoi : सलमान खानसह 10 जण गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर, NIA चा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.