ETV Bharat / state

'शिवशाहीचे मुख्यमंत्री माझ्या आईच्या आरोपींना फाशी द्या'; अश्विनी बिद्रेंच्या मुलीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - अश्विनी बिद्रे न्यूज

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची मुलगी सिद्धी उर्फ सूची गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. या पत्रातून तिने आईचा खून करणाऱ्या आरोपींना लवकरात-लवकर शिक्षा देण्याची मागणी तिने केली आहे.

letter to CM
अश्विनी बिद्रेंची मुलगी सिद्धी हिने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र
author img

By

Published : Feb 18, 2020, 5:43 PM IST

नवी मुंबई - पोलिसांपासून माझ्या बाबांना वाचवा... पोलिसांनीच माझ्या आईला मारलं... माझ्या आईचा मृतदेह शोधून द्या, अशी भावनिक विनंती अश्विनी बिद्रे यांची मुलगी सिद्धी उर्फ सूची गोरे हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे. 10 वर्षीय सिद्धीने यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले असून त्यात त्यांचा उल्लेख 'शिवशाहीचे मुख्यमंत्री' म्हणून केला आहे.

अश्विनी बिद्रेंची मुलगी सिद्धी हिने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र
अश्विनी बिद्रेंची मुलगी सिद्धी हिने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र

'मी सहा वर्षांची असताना माझी आई गमावली आहे. मला आता बाबाला गमवायचं नाही. पोलीस माझ्या बाबाला मारतील की काय? अशी मला नेहमी भीती वाटते. पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने माझ्या आईचा खून करून, मृतदेह वसईच्या खाडीत टाकला. मला माझ्या आईचा मृतदेह शोधून द्या', असे सिद्धीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा - राकेश मारिया यांच्यावर स्क्रिप्ट रायटिंगचा प्रभाव; मारियांच्या आरोपावर एटीएस प्रमुख देवेन भारती यांचे प्रत्युत्तर

सिद्धी हातकणंगले येथील शाळेत पाचव्या इयत्तेत शिकत आहे. अभ्यासात अंत्यत हुशार असलेली सिद्धी सध्या मानसिक तणावात आहे. सिद्धीने स्वतःच्या हस्ताक्षरात उद्धव ठाकरेंना पत्र लिहले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर सकाळी 11 पासून ते रात्र होईपर्यंत थांबलो होतो. त्यांनी आमची भेट घेतली नाही, याचा उल्लेखही सिद्धीने या पत्रात केला आहे.

माझी शिवशाहीच्या मुख्यमंत्र्यांना भेटायची ईच्छा आहे, पण तुम्ही पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे वागणार नाही ना? आमच्यावर झालेला अन्याय सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्याल ना? असे प्रश्नही सिद्धीने तिच्या पत्रात विचारले आहेत. माझे बाबा कोर्टाच्या कामासाठी मुंबईला जातात. यामुळे माझ्यासाठी बाबांना वेळ देता येत नाही. माझ्या बाबाचे काही बरं-वाईट होईल, याची मला सतत भीती वाटत असते. माझ्या आईची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या, तरच मला माझा बाबा परत मिळेल, असे भावनिक आवाहनही तीने पत्रात केले आहे.

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. तपासाअंती पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.