ETV Bharat / state

Ashok Chavan Reaction : थोरातांचे 'ते' पत्र पटोलेंनी नाही पाहिलं! नाना पटोलेंच्या मदतीला धावले अशोक चव्हाण - Balasaheb Thorat and Nana Patole

बाळासाहेब थोरात यांनी दिलेले पत्र नाना पटोलेंनी पाहिलेच नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. थोरात आणि यांच्या सुरू असलेल्या मतभेदांवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कॉंग्रेसमध्ये सर्व स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Ashok Chavan Reaction
अशोक चव्हाण
author img

By

Published : Feb 15, 2023, 10:46 PM IST

काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची आज टिळक भवन येथे बैठक पार पडली.

मुंबई: टोकाच्या संघर्षानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यात प्रभारी एच. के. पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीची आज टिळक भवन येथे बैठक पार पडली. दरम्यान पटोले यांना थोरात यांच्या पत्राबाबत प्रसारमाध्यमांनी छेडले असता, पटोले यांनी पत्र दिले नसल्याचे सांगत सगळे आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच, तुम्हीच पत्र दाखवा, असा प्रतिप्रश्न केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नाना पटोले यांच्या मदतीला धावून आले. पटोले यांनी, थोरात यांचे पत्रच पाहिलेच नाही असे सांगत, सगळे दावेप्रति दावे खोडून काढले. यामुळे एकच हास्यकल्लोळ उडाला.

कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद : शिक्षक, पदवीधर निवडणुकी दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी उडाली. नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्याने हा चिघळला. सत्यजित तांबे यांनी निवडणुकीनंतर नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. बाळासाहेब थोरात यांच्या हाताला दुखापत झाल्याने ते या निवडणुकीपासून लांब राहिले होते. निवडणूक संपल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना थोरात यांनी पत्रव्यवहार करत, पटोले यांच्यासोबत काम करणार नाही, असे नमूद केले होते.

कॉंग्रेसची मुंबईत बैठक : काँग्रेसच्या पडत्या काळात, बाळासाहेब थोरात यांनी पक्ष वाढवण्याचा इंद्रधनुष्य पेलला होता. मात्र, थोरात यांच्या पत्रामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. पक्षश्रेष्ठीना याची दखल घ्यावी लागली. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी मुंबईत येऊन थोरात आणि पटोले यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या आज झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत पटोले आणि थोरात एकाच मंचावर आल्याने दोघांमध्ये मनोमिलन घडून आणण्यात पाटील यशस्वी झाल्याचे बोलले गेले. आजची बैठक हसत्या - खेळत्या वातावरणात पार पडली. दोघांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली.

अंतर्गत वाद मिटला?: काँग्रेसमध्ये कुठेही कोणताही वाद नव्हता. हे मी सुरुवातीपासून सांगत आहे. नागपूर आणि अमरावतीची निवडणूक जिंकण्यासाठी एक वातावरण तयार केले गेले होते. बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आमच्यात कोणताही वाद नाही, असे सांगताना वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले होते. हा सगळा प्रकार फोल ठरल्याचे सांगत पटोले यांनी वादावर पडदा टाकला. एच. के. पाटील मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, प्रसारमाध्यमांनी पाटील, बाळासाहेबांची मनधरणी करायला गेले होते, अशी चर्चा रंगवली. आमच्यात आजही काहीच वादविवाद नाहीत, असे पटोलेंनी स्पष्ट केले.

पोटनिवडणूकी आम्ही जिंकणार : तसेच कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागा आम्ही जिंकू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. अहमदनगर येथील काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी परस्पर बरखास्त करण्याच्या प्रश्नावर पटोले म्हणाले की, जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकारिणी बरखास्त करावीच लागत असल्याचे ते म्हणाले.

अशोक चव्हाण मदतीला धावले : अशोक चव्हाण यांनाथोरात यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेल्या पत्राबाबत पाठवले यांना छेडले असता, मला या पत्रबाबत माहीत नाही. तुमच्याकडे पत्र असेल तर दाखवा, असा प्रतिप्रश्न केला. दरम्यान, प्रभारी एच. के. पाटील यांनी पत्र मिळाल्याची कबुली दिल्याचे आठवण पत्रकारांनी करुन दिली. अशोक चव्हाण पटोले यांच्या मदतीला धावून आले. बाळासाहेब थोरात यांनी पत्र एच. के. पाटील यांना दिले असेल. त्यामुळे पटोले यांनी पत्र पाहिले नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले. चव्हाण यांच्या उत्तराने पत्रकार परिषदेत एकच हास्यकल्लोळ उडाला. एकाच प्रश्नावर अडून राहू नका, पुढे चला असे म्हणत प्रश्नावर पडदा टाकला.

हेही वाचा : Death Threat to Jitendra Awhad Family: जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याचा कट; क्लिप वायरल; महत्वाची माहिती आली समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.