ETV Bharat / state

"महिलांवरील अत्याचाराविरोधात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू"

हिंगणघाट येथील जळीत कांडानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेश येथील अशा घटनासंदर्भातील कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

ginganghat
"महिलांवरील अत्याचारा विरोधात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू"
author img

By

Published : Feb 5, 2020, 4:19 PM IST

मुंबई - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने ज्या प्रकारे कायदा केला आहे, त्याचा अभ्यास करुन कायदा लागू केला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (बुधवारी) दिली. हिंगणघाट येथे घडलेल्या जळीत कांडानंतर राज्यसरकारने हे नवे पाऊल टाकण्याचा विचार केला आहे. त्यासंबंधी गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्र प्रदेशला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

"महिलांवरील अत्याचारा विरोधात आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू"

हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूक : मनोज तिवारी यांची विशेष मुलाखत..

गृहमंत्री म्हणाले, आंध्र प्रदेश सरकारने अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी ज्या प्रकारे कायदा केला आहे त्याची माहिती आम्ही घेणार आहोत. तसा कायदा राज्यात करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व कायदेतज्ज्ञ, असे आम्ही लवकरच आंध्र प्रदेशला जाणार आहोत. त्यासाठी तेथे कशाप्रकारे अंमलबजावणी केली जात आहे आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करुन राज्यातही असा कायदा लागू करता येईल का, असा राज्य सरकार विचार करत असल्याचे देशमुख म्हणाले.

हिंगणघाटच्या घटनेसंदर्भात देशमुख म्हणाले, की जी घटना घडली ती भयंकर आहे. मी स्वत: त्या पीडितेच्या उपचारासाठी नॅशलन बर्न सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरला घेऊन गेलो होतो, त्यांनी उपचारांसंदर्भात संबंधित डॉक्टरांना योग्य सूचना दिल्या आहेत. या पीडितेचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असून, हे या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हे न्यायालयात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची निवड केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा - औरंगाबादेत महिलेला घरात घुसून पेटवले, 95 टक्के भाजली

Intro:
आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू - अनिल देशमुख

mh-mum-01-anildeshmukh-byte-7201153
यासाठीचा बाईट ३ जी लाईव्हवरून पाठविण्यात आला आहे
मुंबई, ता.
राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने ज्या प्रकारे कायदा केला आहे, त्याचा अभ्यास करून तसा कायदा लागू केला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
हिंगघाट येथे घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर राज्यातील सरकारने यासाठीचा विचार सुरू केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात केंद्राच्या दिशा कायद्याप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल काय असे विचारले असता, गृहमंत्री म्हणाले की, आंध्र प्रदेश सरकारने अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी ज्या प्रकारे कायदा केला आहे त्याची आम्ही माहिती घेणार आहोत. तसा कायदा राज्यात करण्यासाठी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, कायदे तज्ज्ञ असे आम्ही लवकरच आंध्र प्रदेशला जाणार आहोत. त्यासाठी तेथे कशा प्रकारे अंमलबजावणी आणि त्याच्या परिणामांचा अभ्यास करून राज्यात आणखी कठोरपणे कारवाई करता येईल असा कायदा करून त्याची लवकरच अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
हिंगणघाटच्या घटनेसंदर्भात देशमुख म्हणाले की, जी घटना घडली ती भयंकर आहे. मी स्वत: त्या पिढीतेच्या उपचारासाठी नॅशलन बर्न सेंटरमधील तज्ज्ञ डॉक्टरला घेऊन गेलो होतो, त्यांनी उपचारांसंदर्भात संबंधित डॉक्टरांना योग्य सूचना दिल्या आहेत. या पिढीतेचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असून हे या प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी हे न्यायालयात ज्येष्ठ वकिल उज्ज्वल निकम यांची निवड केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
Body:आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कायदा लागू करू - अनिल देशमुख
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.