मुंबई : 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला आव्हान देण्यासाठी प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ठाकरेंनी आगामी काळात सरकार विरोधात विरोधकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. उद्धव ठाकरे केजरीवाल, भगवान मान यांच्यामध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली या चर्चेनंतर त्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
मातोश्री नात जपण्यासाठी प्रसिद्ध : यावेळी माध्यमांशी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान हे गेल्या काही दिवसात दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. शिवसेना, आम आदमी पक्ष हे एक घट्ट नातं आहे. नातं जपण्यासाठी शिवसेना, मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोकं केवळ नात्यांचं राजकारण करतात पण आम्ही नातं जपतो.
'या देशात लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत. आज पासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण, केंद्राने अध्यादेश आणला. राज्यांचा अधिकार काढून घेतला. 2024 नंतर राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल." - उद्धव ठाकरे
भाजपचे नेते अहंकारी : उध्दव ठाकरे यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. केजरीवाल म्हणाले, "शिवसेना, मातोश्री आमच्या कुटुंबाचा भाग बनले आहेत. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. दिल्लीनेही आमच्या शहाणपणासाठी लढा दिला. मोदी सरकारने आमची सर्व सत्ता हिसकावून घेतली. ज्या दिवशी निकाल आल्या त्यांच्या 8 दिवसानंतर त्यांनी आध्यादेश जारी केला. या अध्यादेशावरुन भाजप न्यायालयाला मानत नाही असा होते. सर्वोच्च न्यायालय जनतेचा भाजप पक्षांकडून अपमान केला जात आहे. त्यांच्या विरोधात मोहिमा सुरू केल्या जातात.
शिवसेनेवर भाजप सर्वात जास्त आत्याचार करीत आहे. शिवसेनेचे सरकार सीबीआय, ईडीच्या दबावाखाली पाडण्यात आले. जर सरकार बनलं नाही तर मग आमदार तोडायचे, अध्यादेश काढायचे हाच प्रयत्न आहे. अध्यादेश काढून त्यांनी आमच्या शक्ती काढून घेतल्या. - मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
त्यांचं नाव नरेंद्र पुतीन ठेवायला हवं : पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान म्हणाले की, "मातोश्रीवर आल्यावर आम्हाला घरातलं वातावरण मिळतं. देशाचं लोकतंत्र संकटात आहे. elected च्या जागी selected लोकं राज्य चालवत आहेत. तुम्हाला हेच करायचं असेल तर आपल्या मर्जितला राज्यपाल निवडा. राज्यभवन भाजपचे हेड ऑफिस बनले आहेत. भाजप नेते अधिकारी बनले आहेत. आम्हीच राज्य करू असाच अविर्भाव त्यांचा आहे. देश वाचवायला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे.
हेही वाचा -