मुंबई - मानखुर्दमधील चित्रकार पुष्पराज तारी या कलाकाराने महिला डॉक्टरांचा सन्मान करणारे एक टीशर्ट बनवले आहे. या टी शर्टवर मास्क घातलेली महिला डॉक्टर भवानी मातेचे रूप घेते आणि हातात असणारे त्रिशूळ घेऊन कोरोना नावाच्या राक्षसाचा वध करते, असे चित्र काढण्यात आले आहे. संकट समयी वैद्यरूपी भवानी उभी आपल्यासाठी’ मानाचा सलाम, असा संदेश टी शर्टवर लिहीण्यात आला आहे.
‘टी शर्ट’वर डॉक्टरांच्या लढ्याचा सन्मान : चित्रातून मानले आभार 'कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला. धर्म स्थळे बंद करण्यात आली आहेत. चित्रकार म्हणून समाजाला काही सामाजिक संदेश द्यायचा होता. आज धर्म स्थळे जरी बंद असली तरी देव डॉक्टरांच्या रुपात 24 तास काम करत आहे. त्यांना मानाचा सलाम देण्यासाठी मी चित्र तयार केले आहे. तसेच चित्राच्या माध्यमातून लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी देखील जनजागृती करत आहे, असे पुष्पराज यांनी सांगितले.‘टी शर्ट’वर डॉक्टरांच्या लढ्याचा सन्मान : चित्रातून मानले आभार