ETV Bharat / state

मध्य रेल्वेच्या ताफ्यात 'अर्जून' रोबोट दाखल, स्क्रीनिंग आणि सुरक्षेसाठी उपयोगी

रोबोटिक कॅप्टन अर्जून प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण देईल आणि त्याच्या देखरेखीमुळे वाढीव सुरक्षा मिळेल, असे मित्तल यांनी यावेळी म्हटले. कॅप्टन अर्जून हा मोशन सेन्सर, एक पीटीझेड कॅमेरा (पॅन, टिल्ट, झूम कॅमेरा) आणि एक डोम कॅमेराने सुसज्ज असा आहे.

'Arjun' robot launched in india
मध्य रेल्वेच्या ताफ्यात 'अर्जून' रोबोट दाखल
author img

By

Published : Jun 12, 2020, 10:03 PM IST

मुंबई - कोरोनापासून प्रवाशांचे आणि रेल्वे कर्मचार्‍यांचे संरक्षण व सुरक्षा करण्याच्या प्रयत्नात भारतीय रेल्वेने विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने पुणे येथे आज तपासणी व देखरेखीची गती वाढवण्यासाठी कॅप्टन "अर्जून" हे रोबोट दाखल केले. प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी तसेच असामाजिक घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी अर्जुनला आज लाँच केले गेले.

रेल्वे बोर्डातील आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांच्या हस्ते आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुख्य सुरक्षा अतुल पाठक, आयुक्त रेणू शर्मा यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी रोबोटिक कॅप्टन "अर्जून"ला ऑनलाईन लाँच केले. यावेळी संजीव मित्तल, जनरल मॅनेजर यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नाविन्याची प्रशंसा केली. रोबोटिक कॅप्टन अर्जून प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण देईल आणि त्याच्या देखरेखीमुळे वाढीव सुरक्षा मिळेल, असे मित्तल यांनी यावेळी म्हटले. कॅप्टन अर्जून हा मोशन सेन्सर, एक पीटीझेड कॅमेरा (पॅन, टिल्ट, झूम कॅमेरा) आणि एक डोम कॅमेराने सुसज्ज असा आहे.

संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्ता अल्गोरिदम वापरतात. इनबिल्ट सायरन, मोशन अ‍ॅक्टिवेटेड स्पॉटलाइट एच -264 प्रोसेसर यात आहेत. नेटवर्क बिघाड झाल्यास रेकॉर्डिंगसाठी अंतर्गत अंगभूत स्टोरेजदेखील आहे. कॅप्टन अर्जून थर्मल स्क्रीनिंग करतो आणि ०.५ सेकंदात प्रतिक्रियेसह डिजिटल डिस्प्ले पॅनेलमध्ये तापमान नोंदवितो. तापमान संदर्भ श्रेणीपेक्षा जास्त असल्यास स्वयंचलित अलार्म होतो. यामध्ये संप्रेषणाचे दोन मार्ग आहेत. व्हॉईस मोड आणि व्हिडिओ मोड तसेच हा स्थानिक भाषेतदेखील बोलतो.

कोविड-१९ संदर्भात जागरूकता संदेश देण्यासाठी यामध्ये स्पीकर्स बसविण्यात आले आहेत. कॅप्टन अर्जुनकडे सेन्सर आधारित सॅनिटायझर आणि मास्क डिस्पेंसरदेखील आहे. रोबोटमध्ये फ्लोर सॅनिटायझेशनसाठी चांगली सुविधा आहे. याला खडबडीत चाके आहेत, जी सर्व प्रकारच्या पृष्ठभागावर चालू शकतात. मध्य रेल्वेच्या कॅप्टन अर्जून या नावीन्यामागील ब्रेन चाईल्ड आलोक बोहरा डीआयजी आरपीएफ यांचे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.