मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण ( Arguments on Anil Deshmukh Bail Application ) झाला. न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी निकाल राखून ठेवला होता. 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजात अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी अनिल देशमुख यांना जामीन मिळतो की कारागृहातील मुक्काम वाढतो याकडे आता सर्वात लक्ष लागला आहे.
गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल : अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल (Anil Deshmukh Money Laundering Case ) केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचा यापूर्वी जामीन मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला सीबीआयच्यावतीने विरोध करण्यात आला आहे.
सीबीआयविरोधात युक्तीवाद : अनिल देशमुख यांच्या जामिनाला सीबीआयच्यावतीने युक्तीवादा दरम्यान विरोध करण्यात आला ( Anil Deshmukh Bail Argument Against CBI ) आहे. वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख यांच्यावतीने करण्यात आलेल्या युक्तिवादामध्ये तपास यंत्रणेकडे कुठलेही पुरावे नाही असे म्हटले आहे. सचिन वाझे यांच्या जबाबावर अनिल देशमुख यांना दोषी मानत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना त्यांच्या वाढते वयाचे देखील लक्षात घेतले पाहिजे. अनिल देशमुख यांना विविध आजारांनी ग्रासले आहे. वैद्यकीय उपचार पाहिजे तसे मिळत नाहीत. सत्तेचा गैरवापर करून केवळ आरोपांवर बेकायदेशीररित्या अटक केली. त्यांना जामीन मिळालेल्यांचे दाखले देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांनी दिले आहे. लक्षात घेता जामीन मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण? : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ( Mahavikas Aghadi Government ) पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृह मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.