ETV Bharat / state

अनधिकृत बांधकामप्रकरणी काँग्रेस आमदाराचे नाव घेतल्याने सभागृहात बाचाबाची

डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. यावेळी जाधव यांनी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांचे नाव घेतल्याने काँग्रेसने याला विरोध केला. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव
author img

By

Published : Jul 19, 2019, 9:23 PM IST

मुंबई - डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. यावेळी जाधव यांनी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांचे नाव घेतल्याने काँग्रेसने याला विरोध केला. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव

मुंबईच्या डोंगरी येथील केसरबाई इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

यावर बोलताना जाधव म्हणाले, बी, सी, डी आणि ई विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. डोंगरी येथील केसरबाई इमारतीच्या दुर्घटनेला तसेच तेथील अनधिकृत बांधकामांना या विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभाग, लायसन्स विभाग यामधील अधिकारी जाबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

त्याचवेळी अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या विभागात काँग्रेसचे आमदार आणि आणि नगरसेवक निवडून येत आहेत त्यामुळे त्यांनाही दोषी ठरवून कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, जाधव यांनी पालिका सभागृहात अनधिकृत बांधकामांना काँग्रेसचे आमदार अमीन पटेलही दोषी असल्याचे म्हटल्याने त्याला काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. यावेळी सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांत शाब्दिक बाचाबाची झाली.

विरोधी पक्षनेते रवी राजा व काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी स्थायी समिती अध्यक्षांनी थेट आमदारांवर आरोप करणे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. यावर यशवंत जाधव यांनी आपण वस्तुस्थिती मांडत आहे. मागील १० वर्षात डोंगरी येथे ५ दुर्घटना घडल्या आहेत. आजही केसरबाई इमारतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे सांगितले.

Intro:मुंबई
डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. यावेळी जाधव यांनी काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांचे नाव घेतल्याने काँग्रेसने याला विरोध केल्याने काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. Body:मुंबईच्या डोंगरी येथील केसरबाई इमारत मंगळवारी कोसळली. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. या मृतांना पालिका सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी दुर्घटनेला जबाबदार असलेल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावर बोलताना बी, सी, डी आणि ई विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. डोंगरी येथील केसरबाई इमारतीच्या तसेच या विभागातील अनधिकृत बांधकामांना अधिकारी दोषी आहेत. यासाठी या विभागातील अतिक्रमण निर्मूलन विभाग, लायसन्स विभाग यामधील अधिकारी जाबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मात्र त्याचवेळी अनधिकृत बांधकामांना स्थानिक लोप्रतिनिधीही जबाबदार असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. या विभागात काँग्रेसचे आमदार आणि आणि नगरसेवक निवडून येत असल्याचे जाधव म्हणाले यामुळे त्यांनाही दोषी ठरवून कारवाई करावी अशी मागणी जाधव यांनी केली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका सभागृहात अनधिकृत बांधकामांना काँग्रेसचे आमदार अमीन पटेलही दोषी असल्याचे म्हटल्याने त्याला काँग्रेसच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. यावेळी सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांत शाब्दिक बाचाबाची झाली. विरोधी पक्ष नेते रवी राजा व काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी स्थायी समिती अध्यक्षांनी थेट आमदारांवर आरोप करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला. यावर स्थशयी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपण वस्तुस्थिती मांडत आहे. गेल्या दहा वर्षात डोंगरी येथे पाच दुर्घटना घडल्या आहेत. आजही केसरबाई इमारतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याचे सांगितले.

यशवंत जाधव यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.