उस्मानाबाद - देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन 21 दिवस कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बुधवार (दि. 25 मार्च) गुढीपाडवा मराठी नववर्षाचा दिवस या दिवशी बाजारात प्रचंड गर्दी पहायला मिळते होती. पण, कोरोनामुळे गुढीपाडवाच्या काळातही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला.
शहरातील भाजी मार्केट, किराणे दुकाने सामसूम होती. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू म्हणजेच किराणा, भाजीपाला विक्रेत्यांनी आपल्या दुकानाबाहेर आपल्यात-ग्राहकांत तसेच दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर असावे यासाठी आखणी केली आहे.
हेही वाचा - इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानीचा गुढीपाडवा भक्ताविना