ETV Bharat / state

Teacher On Hourly Basis : राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये तासिका तत्वावर शिक्षक नियुक्ती; शिक्षणासाठी धोक्याची घंटा

राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, ( Recognized Secondary School in the State ) उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयासाठी तासिका तत्वावर शिक्षकांची नियुक्ती ( Teacher on hourly basis ) करण्याचा सरकाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शिक्षकामध्ये नाराजी असून शिक्षण क्षेत्रावर ( Impact on education sector ) याचे दुरगामी परिणाम होणार आहेत.

Teacher On Hourly Basis
तासिका तत्वावर शिक्षक नियुक्ती
author img

By

Published : Nov 23, 2022, 10:48 PM IST

मुंबई - महाराष्ट्र शासनाने काल उशिरा राज्यातील समस्त माध्यमिक शाळांसाठी ( Recognized Secondary School in the State ) उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी तासिका तत्वावर शिक्षक ( Teacher on hourly basis ) नेमण्याचे ठरवलेले आहे या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात दूरगामी परिणाम ( Impact on education sector ) होण्याचा संभव आहे. याची संभावना ईटीव्हीने नुकतीच व्यक्त केली. तसेच झाले शिक्षण क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तासिका तत्वावर शिक्षक नियुक्ती

तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक - राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा अर्थात इयत्ता नववी, दहावी आणि उच्च माध्यमिक शाळा इयत्ता अकरावी, बारावी तसेच कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी तासिका तत्त्वावर अर्थात क्लॉक अवर बेसिस या तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक होणार ( Appointment of teachers on hourly basis ) आहे. ज्या ठिकाणी अर्धवेळ शिक्षक नसेल तर घड्याळी तासिकेनुसार शिक्षकांना मानधन देण्यात येईल.

मानधनावर भावी शिक्षकांचे भवितव्य - या तासिका तत्त्वावर ज्या शिक्षकांची नियुक्ती होईल. त्यामध्ये माध्यमिक स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रतितास 120 रुपये असे मानधन दिले जाईल. तर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात काम करणाऱ्या या शिक्षकांना रुपये 150 प्रती तास असे मानधन देण्यात येणार आहे. हा शासन निर्णय राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये लागू असणार आहे. राज्यामध्ये मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या ही तीन लाखाच्या पेक्षा अधिक आहे .या क्षेत्रावर याचे दूरगामी परिणाम ( Impact on education sector ) होणार आहे.

शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण - ह्या बाबत शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना सांगितले की," शासनाने घेतलेले हा निर्णय गेल्या 30 ते 40 वर्षांमध्ये असा निर्णय घेतलेला नाही. माध्यमिक शाळांच्या साठी तासिका तत्त्वावर यापूर्वी कधीही शिक्षक नेमले गेलेले नाही. मात्र आता शासनाने नुकताच हा निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे त्यामुळेच राज्यातील लाखो शिक्षकांमध्ये या संदर्भात चिंता आहे. उच्च माध्यमिक स्तरावर काम करणाऱ्या अशा शिक्षकांना 150 रुपये प्रति घंटा तर माध्यमिक स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना प्रति घंटा 120 रुपये असे मानधन देण्याची यात तरतूद आहे. मात्र याचे दुर्गा मी वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आहे."

विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात - तर मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग केंगार यांनी बातचीत करताना सांगितले की "आमच्या हयातीत या प्रकारचा माध्यमिक शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक नियुक्तीचा निर्णय पाहिलेला नाही वाचलेला नाही. मात्र आता कंत्राटी शिक्षक हा तासिका तत्त्वाच्या आधारे नेमण्याचा शासनाचा विचार असल्याचे स्पष्ट होते."

शिक्षक होणार बेरोजगार - दुसरे शिक्षक ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की," यामुळे नवीन शिक्षक भरती होणार पण त्यामध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षकांना काम करावे लागणार म्हणजे ज्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यांनाच पोटभर पुरेसे जगण्यासाठी यातून रोजगार मिळत नाही. त्यामुळे या शासन निर्णयाचा परिणाम म्हणजेच मुलांवर आणि शिक्षणावर नकारात्मक होणार आहे. ज्याला दिवसाला पोटभर अन्न घराचं भाडं इतर सर्व गरजा भागवता येईल असा पगार मिळाला तरच तो शिक्षक प्रेमाने आणि मनाने शाळेमध्ये शिकवू शकेल."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.