मुंबई - सध्या सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय वादात अन्वय नाईक ( Anvay Naik ) हे सारखं समोर येतंय. या संदर्भात आता अन्वय नाईक ( Anvay Naik Family ) यांच्या पत्नी अक्षता व मुलगी आज्ञा नाईक ( Akshata and Aadnya Naik ) यांनी 'आम्ही पण फासावर लटकावं, अशी किरीट सोमैयांंची इच्छा आहे का?' असा सवाल उपस्थित केला.
सुरक्षा काढून घेतली, जीवाला धोका -
अक्षिता व आज्ञा नाईक म्हणाल्या की, "आम्हाला काल (15 फेब्रुवारी) पत्र आलंय तुमची सुरक्षा काढून घेण्यात येत आहे म्हणून. यात सुरक्षा काढून घेण्यामागचं कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही. आमच्या जीवाला धोका आहे. घरी आम्ही मायलेकी दोघीच असतो. हे राजकारणी लोकांना माहीत आहे तरी सुद्धा कोणतंही करण न देता आमची पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. उद्या आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची जबाबदारी हे राजकारणी घेणार का ?" असा सवाल नाईक कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - Narayan Rane on Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर संजय राऊत यांचा डोळा - नारायण राणे
'आमचा मानसिक छळ सुरू आहे' -
"स्वतः किरीट सोमैयांना खुप सुरक्षा आहे. मात्र, हे लोक प्रत्येक वेळी जुन्या प्रसंगांची आठवण करून देतात. म्हणजे आम्ही पण फासावर लटकावं, अशी सोमैयांची इच्छा आहे का? जवळपास दीड वर्ष झालं, आमचा मानसिक छळ सुरू आहे. आमच्या वैयक्तिक न्यायालयीन लढ्याला नेहमी राजकीय वळण का दिलं जातं हे कळत नाही." अशी प्रतिक्रिया नाईक कुटुंबीयांनी दिली आहे.