ETV Bharat / state

Mumbai High Court : अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका, विक्रीकर आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माची विक्रीकर आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या कर सल्लागाराने विक्रीकर आदेशाविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या (Anushka Sharmas plea challenging sales tax order). मुंबई हायकोर्टाने (Mumbai HC) दोन्ही याचिका फेटाळून लावल्या.

Anushka Sharmas plea challenging sales tax order dismissed by Mumbai HC
अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका
author img

By

Published : Dec 21, 2022, 1:09 PM IST

Updated : Dec 21, 2022, 3:45 PM IST

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माला (Anushka Sharma) उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माची विक्रीकर आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या कर सल्लागाराने विक्रीकर आदेशाविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या. कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत 2012-13 आणि 2013-14 मूल्यांकन वर्षांची थकबाकी वाढवण्याच्या माझगावच्या विक्रीकर उपायुक्तांनी दिलेल्या आदेशांना अनुष्का शर्माने आव्हान दिले होते.

याचिकाकर्त्याच्या कर सल्लागाराने दाखल केल्या : अनुष्काने या याचिका स्वत:ऐवजी कर सल्लागार श्रीकांत वेळेकर यांच्यामार्फत दाखल केल्यामुळे कोर्टने नाराजी व्यक्त केली. या याचिका याचिकाकर्त्याच्या कर सल्लागाराने दाखल केल्या आहेत. अनुष्का या याचिका प्रतिज्ञापत्रावर दाखल करू शकत नाहीत असे कोणतेही कारण नाही, असे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. अशाप्रकारच्या रिट याचिका फेटाळल्या जातात. याचिकाकर्त्याला याचिकाकर्त्याच्या स्वतःच्या प्रतिज्ञापत्रावर याचिका दाखल करण्याची मुभा असते, असे कोर्टाने (Mumbai HC) स्पष्ट केले.

अभिनेत्रीला मोठा झटका : आता अभिनेत्री अनुष्का शर्माला उच्च न्यायालयाचा झटका मिळाला आहे. दरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्माच्या कर सल्लागाराने विक्रीकर आदेशाविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माची विक्री कर आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली (Anushka Sharmas plea challenging sales tax order) आहे. संपूर्ण प्रकरण असे आहे की, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत 2012-13 आणि 2013-14 मूल्यांकन वर्षांची थकबाकी वाढवण्याच्या माझगावच्या विक्रीकर उपायुक्तांनी दिलेल्या आदेशांना अनुष्का शर्माने आव्हान दिले होते. मात्र आता उच्च न्यायालयाने अभिनेत्रीला मोठा झटका दिला आहे.

अनुष्काच्या वर्कफ्रंट विषयी : दरम्यान अनुष्काच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचे तर ती 2018 मध्ये आनंद एल राय दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर 'झिरो' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट साईन केला नव्हता. ती तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करत होती. पण मुलगी वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने यातून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता तब्बल 4 वर्षांनी अनुष्का ही ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.

Last Updated : Dec 21, 2022, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.