मुंबई Anuraj Thakur On Constituency : याप्रसंगी अनुराग ठाकूर म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. त्यासाठी भाजपाची ताकद मजबूत करण्यासाठी आम्ही वारंवार प्रत्येक राज्यामध्ये संघटनात्मक कार्यक्रम करत आहोत. त्याचबरोबर २०२४ च्या निवडणुका लक्षात घेता रणनीती सुद्धा तयार करत आहोत. आम्हाला कुठला एकच मतदारसंघ नाही, तर प्रत्येक विधानसभा, लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानमध्ये बघितलं तर तेथे खासदार, मंत्री यांना सुद्धा निवडणूक लढवण्यास सांगितलं गेलं आहे. तर पक्ष किती ताकतीने व किती गांभीर्याने निवडणूक लढवत आहे, हे दिसून येईल. आम्ही जिंकण्यासाठी निवडणूक लढवत आहोत. कारण देशातील साडेतेरा कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढण्याचं काम पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलं गेलं आहे. गरीब कल्याण योजना मोदी यांच्या नेतृत्वात झाली.
तोडा आणि राज्य करा: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, इंग्रज तर निघून गेले; परंतु काँग्रेसने त्यांचे विचार अजूनही जिवंत ठेवले. 'तोडा आणि राज्य करा' हीच त्यांची भूमिका राहिली आहे. कधी जात-पात, धर्माच्या नावावर मत मागितली जातात. परंतु मोदी हे "सबका साथ सबका विकास" या आधारेच राज्य करत आहे. मोदी यांच्या राज्यात जो गरीब व गरजू आहे त्याला त्याचा लाभ भेटला आहे. जनधन, आधार, मोबाईल या ताकतीने गरिबांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. जे भ्रष्टाचार करायचे त्यांना यापासून पूर्णतः दूर लोटलं गेलं आहे. या कारणाने देशाचे लाखो, करोडो वाचलेसुद्धा व गरिबांच्या खात्यात पोहोचले. सुशासन व विकास हीच नरेंद्र मोदी यांच्या सरकारची खरी ओळख आहे.
'खेलो इंडिया' अभियानातून प्रगती: अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात क्रीडा विभागासाठी ८६४ कोटींचं बजेट असायचं. ते आम्ही तीनपटी पेक्षा जास्तीने वाढवलं. त्याचबरोबर "खेलो इंडिया अभियान" चालू केलं. ज्याच्या अंतर्गत पहिल्या ४ वर्षांत ३,००० करोड व आता ३,५०० करोड मंजूर केले आहेत. खेलो इंडिया युथ गेम, युनिव्हर्सिटी गेम व विंटर गेम यामध्ये १५०० खेळाडू भाग घेतात. त्यातून सुद्धा इतकी प्रतिभा समोर आली आहे की, एशियन गेम्समध्ये खेळाडू गेल्यावर ६२५ खेळाडूंमध्ये १३० खेळाडू हे 'खेलो इंडिया' अभियानांतर्गत निवडून गेले आहेत आणि त्यातून ४५ खेळाडूंनी पदक जिंकलं आहे. ही मोदी सरकारची फार मोठी सफलता आहे.'खेलो इंडिया'वर आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं असून याने खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन भेटत आहे. खेळाडूंनी सुद्धा शानदार प्रदर्शन केलं आहे.
खेळात राजकारण नाही: खेळामध्ये राजकारण केलं जातं असा आरोप सरकारवर लगावला जात आहे; परंतु या मुद्द्यावर बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, तामिळनाडूमध्ये 'खेलो इंडिया' होत आहे. आम्ही त्यात कुठलाही भेदभाव केलेला नाही. 'चेस ओलंपियाड' तामिळनाडूमध्ये झालं. ओरिसामध्ये हॉकीचा वर्ल्डकप केला. खेळ हा राज्याचा विषय आहे. खेळात केंद्र मोठी भूमिका निभावत आहे. आम्ही विचार करतो की, यासाठी प्रत्येक राज्यांनीसुद्धा पुढे यावं. यंदा महाराष्ट्राने सुद्धा मोठी पदकं जिंकली आहेत. कारण महाराष्ट्र सरकारसुद्धा खेळासाठी छान काम करत आहे, असेही ठाकूर म्हणाले.
हेही वाचा:
- Nana Patole On Mungantiwar: बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला उत्तर देण्याची गरज नाही, मुनगंटीवारांना उत्तर देण्यास नानांचा नकार
- Nashik Drug Case : ड्रग्सविरोधात मोर्चा मातोश्रीवर काढा; नितेश राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
- Sharad Pawar News : रिक्त जागांबाबत कायमस्वरुपी भरती करावी, कंत्राटी भरतीवरून शरद पवारांचा सरकारला सल्ला