ETV Bharat / state

Antilia bomb scare case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची एनआयए कडून सखोल तपास केलेला नाही; न्यायालयाचे निरीक्षण - Antilia bomb scare case

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया घरासमोर जेलेटिन प्रकरणात राष्ट्रीय तपास एनआयएकडून करण्यात आलेल्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने एनआयएच्या तपासावर ताशेरे ओढले आहे. अँटिलिया जिलेटीन प्रकरण आणि व्यापारी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची तपास सखोल करण्यात आला आहे. करण्यात आलेला तपास हा गोंधळून टाकणारा आहे. अशा शब्दात एनआयएला फटकारले आहे. या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

Antilia Case And Mansukh Hiren Death Case
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
author img

By

Published : Jan 24, 2023, 9:39 AM IST

Updated : Jan 24, 2023, 12:18 PM IST

मुंबई : न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या खंडपीठाने पुढे म्हटले की एकट्या आरोपीकडून अर्थात सचिन वाझेकडून हा सगळा कट रचला जाऊ शकत नाही. यात एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने जिलेटिनच्या कांड्या कोणासोबत ठेवण्याचा कट रचला होता. यावर एनआयएने मौन बाळगले आहे. इतरांच्या मदतीने कट रचल्याचे एनआयएने म्हटले होते. परंतु षडयंत्र रचणाऱ्या इतरांची नावे मात्र उघड केलेली नाहीत असे खंडपीठाने नमूद केले.

न्यायालयाने नोंदवले मत : स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवण्याचे षडयंत्र रचणाऱ्या इतरांच्या संदर्भात एनआयएने तपास केलेला नसल्याचे आम्हाला प्रथमदर्शनी आढळून आलेले आहे. या संदर्भातील अनेक प्रश्नांवर एनआयए अनुत्तरीत आहे. एवढ्या मोठ्या प्रकरणात सचिन वाझे इतरांच्या मदतीशिवाय किंवा मार्गदर्शनाशिवाय सहभागी असेल हे पूर्णतः अशक्य आहे. या प्रकरणात बरंच नियोजन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. म्हणजे संबंधिताने ऑबेरॉय हॉटेलमध्ये 100 दिवसांसाठी एक रुम बूक केली होती. हॉटेलमधील रुमच्या बुकिंगसाठी रोख पैसे दिले होते. बनावट आधार कार्ड दिले होते. हे सगळे एकट्याच कामच नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.

अहवाल मीडियाला लीक केला : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांना ठराविक रक्कम दिली होती, असे विधान सायबर तज्ज्ञाने केले होते. ज्याची न्यायालयानेही दखल घेतली. एनआयएने सायबर तज्ज्ञाचाही जबाब नोंदवला होता. ज्यामध्ये म्हटले होते की परमबीर सिंह यांनी त्याला अहवालात बदल करण्यास सांगितले आणि नंतर तो अहवाल मीडियाला लीक केला. एनआयएच्या तपासाबाबत खंडपीठाने म्हटले की साक्षीदाराला म्हणजे सायबर एक्स्पर्टला एवढी मोठी रक्कम का देण्यात आली? आयुक्तांना त्यामध्ये काय स्वारस्य होतं? याच्या उत्तरांबाबत हा ग्रे एरिया आहे याबाबत कोणतीही उत्तरे नाहीत असे मतही खंडपीठाने एनआयएच्या तपासाबाबत व्यक्त केले होते.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमकं काय? : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत एनआयएने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत. या प्रकरणात आठ आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आठ ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

पुरावे पोलिसांच्या हाती लागले : मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमके काय घडले याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकले. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचे पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत डोक्यालाही मार लागलेला होता.

हेही वाचा : Antilia Explosive Case अँटिलिया स्फोटके प्रकरण आरोपी रियाजुद्दीन काझीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिन

Last Updated : Jan 24, 2023, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.