मुंबई - अॅन्टी रेबीज लसीचा पुरवठा कमी पडू दिला जाणार नसल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सहकारनगर, पर्वती येथील शासकीय भुखंड गैरव्यवहार प्रकरणी चौकशीही करणार असल्याचेही सागर यांनी यावेळी सांगितले.
क्षयरोगी रुग्णांना १०० टक्के मदत करणार - एकनाथ शिंदे
क्षयरोग असणाऱ्या रुग्णांना डीबीटीतून १०० टक्के आर्थिक मदत देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली.
रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी शॉर्ट टेंडर काढणार - चंद्रकांत पाटील
रस्ते सुस्थितीत ठेऊन काम सुरू करण्यासाठी शॉर्ट टेंडर काढणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. तसेच किनवट- भोकर राज्य महामार्ग -१६१ कोठारी- हिमायतनगर कंत्राट रद्द करुन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार असल्याचेही पाटील म्हणाले.