ETV Bharat / state

अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड; मागील १८ महिन्यापासून पगाराविना - annabhau sathe

मुंबईतील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मागील १८ महिन्यांपासून पगार देण्यात आलेला नाही.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कार्यालय
author img

By

Published : Jul 1, 2019, 12:33 PM IST

मुंबई - सामाजिक न्याय विभागालाच सामाजिक न्यायाची अपेक्षा लागली आहे. कारण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक समितीच्या गोवंडी कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी जागा मालकाने टाळे ठोकले. ही घटना ताजी असतानाच आता या समितीच्या १९ कर्मचाऱ्यांना गेली दीड वर्षे पगारच मिळाला नसल्याचे समोर आले आहे.

आपली व्यथा मांडताना कर्मचारी

अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मुंबईत बनले पाहिजे ही मागणी समाजाच्या विविध स्तरातून अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करून २०१७ ला काम चालू करत हे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक घाटकोपरमधील चिराग नगर येथे बनवण्यासाठी राज्य सरकारने स्मारक समिती कार्यान्वित केली. या समितीसाठी कार्यालय निर्माण केले आहे. यात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारकासाठी ६ मजली इमारत असणार आहे.

मुंबईत स्मारकाचे कार्यालय गोवंडीत अर्जुन सेन्टरमध्ये थाटण्यात आले होते. राज्य सरकारने ही समिती तयार केली असून हे स्मारक तयार करण्याचे संपूर्ण कामकाज बार्टीद्वारे नेमलेल्या या समितीकडून पाहण्यात येते. या समिती एकूण १९ कर्मचारी १ जानेवारी, २०१८ पासून या ठिकाणी काम करत आहेत. त्यांना कामाला लागल्यापासून पगारच मिळाला नाही. यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. अशी परिस्थिती राहिल्यास आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी प्रतिक्रिया येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तर याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाल्यानंतर खोटी माहिती दिली गेल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी हे कर्मचारी करत आहेत.

याप्रकरणी बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाकडे तक्रार करून देखील या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही. आतापर्यंत दीड कोटीचा पगार थकीत आहे. त्यात फर्निचरचे ६० लाख रुपयेदेखील थकविण्यात आले आहेत. याबाबत पाठपुरावा करून देखील पगार काढले जात नसल्याचे या समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणत आहेत. तर सामाजिक न्याय विभागालाच सामाजिक न्याय करायचा नाही, अशी टीका या समितीचे उपाध्यक्ष मधुकरराव कांबळे यांनी केली आहे.

Intro:अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे कर्मचारी पगारविना

सामाजिक न्याय विभागालाच सामाजिक न्यायाची अपेक्षा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक समितीच्या गोवंडी कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी जागा मालकाने टाळे ठोकल्याची घटना ताजी असतानाच आता या समिती च्या कर्मचाऱ्यांना गेली दीड वर्ष पगारच मिळाला नसल्याचे समोर आले आहे.19 कर्मचारी या कार्यालयात 1 जानेवारी 2018 पासून पगारविना कार्यरतBody:अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे कर्मचारी पगारविना

सामाजिक न्याय विभागालाच सामाजिक न्यायाची अपेक्षा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारक समितीच्या गोवंडी कार्यालयाला काही महिन्यांपूर्वी जागा मालकाने टाळे ठोकल्याची घटना ताजी असतानाच आता या समिती च्या कर्मचाऱ्यांना गेली दीड वर्ष पगारच मिळाला नसल्याचे समोर आले आहे.19 कर्मचारी या कार्यालयात 1 जानेवारी 2018 पासून पगारविना कार्यरत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून शोषित, पीडित, कामगार, कष्टकरी वर्ग, सामाजिक विषमता आपल्या लेखणीतून जगभर पसरली आणि समाजातील दुःख मांडले .अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक मुंबईत बनले पाहिजे ही मागणी समाजाच्या विविध स्थरातून कित्येक वर्षे केली जात होती . त्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन करून 2017 ला कार्य चालू करत हे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक घाटकोपर चिराग नगर येथे बनवण्यासाठी राज्य सरकारने स्मारक समिती कार्यान्वित केली व समितीसाठी कार्यालय निर्माण केले आहे. यात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारकासाठी सहा मजली इमारत असणार आहे.
मुंबईत स्मारकाचे कार्यालय असायला हवे यासाठी गोवंडीत अर्जुन सेन्टर मध्ये थाटण्यात आले .
राज्य सरकारने ही समिती तयार केली असून हे स्मारक तयार करण्याचे संपूर्ण कामकाज बार्टी द्वारे नेमलेल्या या समितीचे कर्मचारी पाहत आहेत.एकूण 19 कर्मचारी 1 जानेवारी 2018 पासून या ठिकाणी काम करीत असून त्यांना कामाला लागल्यापासून पगारच मिळाला नाही.या मुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे.अशी परिस्थिती राहिल्यास आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी प्रतिक्रिया येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.तर या बाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाल्यानंतर खोटी माहिती दिली गेल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.या बाबत लवकरात लवकर उपाय योजना करण्याची मागणी हे कर्मचारी करीत आहेत.

"या प्रकरणी बार्टीकडे आणि सामाजिक न्याय विभागाकडे वारंवार तक्रार मागणी करून देखील या प्रश्नाकडे मुद्दाम लक्ष दिले जात नाही.आता पर्यंत दीड कोटी पर्यंत चा पगार थकीत आहे.त्यात फर्निचर चे साठ लाख रुपये देखील थकविण्यात आले आहेत.या बाबत पाठपुरावा करून देखील पगार काढले जात नसल्याचे या समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणत आहेत.तर सामाजिक न्याय विभागालाच सामाजिक न्याय करायचा नाही अशी टीका या समितीचे उपाध्यक्ष मधुकरराव कांबळे यांनी केली आहे".

मधुकरराव कांबळे (उपाध्यक्ष समिती)

"माझे मुलं बाळ रस्त्यावर आले आहेत. मी नातेवाईक व मित्राकडून इतके दिवस घर चालवले आता शक्य नाही. मी अपंग असल्याने इतर कोणतेही काम करू शकत नाही. अशी वेळ कोणावरही येऊ नये 18 -18 महिने पगार मिळत नाही हे मोठे .दुःख आहे. आता असे वाटते की, आत्महत्या करावी लोकांचे पैसे घेऊन घर प्रपंच केला पण लोक आता रोज पैशासाठी तगादा लावत आहेत".

सुधीर कडू ( शिपाई कर्मचारी )

"शासनाकडून या समिती गठन झाल्यानंतर एक जी आर काढण्यात आला यात बार्टी पुणे या समितीला आर्थिक मदत व समिती कार्यालयाचे देखभाल करावे .या समितीच्या थकीत बिल व कर्मचारी पगारसाठी गेल्या दीड वर्षांपासून समितीचे उपाध्यक्ष कांबळे यांनी पत्रव्यवहार केला आहे.पण आता कुठे तरी आम्हाला बार्टी कडून हेतुपरस्सर डावलण्यात येत आहे.असे दिसत आहे. शासन जर कर्मचारी पगार थकवून कर्मचाऱ्यांचा अंत पाहत असेल तर येथील कर्मचारी जीवनाचा शेवट करणे योग्य असेल असाच विचार करीत आहेत.18 - 18 महिने मुंबईत विना पगार कसे दिवस मुलं बाळ घेऊन काढत आहोत हे आम्हालाच माहीत आहे.शासन पगार का देत नाहीत याचे कारण ही सांगत नाहीत.यामुळे या कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर समितीला गाल बोट लागेल व शासन सर्वस्वी याला जबाबदार राहील."

प्रभाकर गायकवाड (लेखाधिकारी समिती)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.