मुंबई - देवेंद्र फडणवीसांनी उगाच टीका करायची म्हणून करू नये. तुमची सत्ता असलेल्या केंद्र सरकारने सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्तांना किती मदत केली? अवकाळीग्रस्तांनाही काय मदत झाली? ह्याची उत्तरं द्यावीत, असे म्हणत मनसे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
हेही वाचा - 'CAA व NRC च्या माध्यमातून राज्य आणि केंद्रात वाद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकरी कर्जमाफीची जाहीर केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत घेतलेले २ लाखापर्यंतचे सर्व थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, असे या योजनेचे नाव आहे. यावर भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती, त्यावर शिदोरे यांनी ट्विट करून टीका केली आहे.
हेही वाचा - एवढ्या कर्जमाफीवरच थांबणार नाही, शेतकरी चिंतामुक्त करणार - मुख्यमंत्री
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योग्य आहे, पण पुरेशी नाही. कुठलीही अट नाही, हे चांगले असले तरी "संपूर्ण सातबारा कोरा करणार" ह्या घोषणेकडे कसे जाणार? आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, ह्यासाठी कुठली पावले उचलणार? हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. अवकाळी पावसाने ग्रस्त असलेल्यांना कुठलीही मदत जाहीर झालेली नाही हे बरोबर नाही. ह्या बाबतीत केंद्र सरकारनंही (भाजप) काहीही केलेले नाही, असेही शिदोरे म्हणाले.