ETV Bharat / state

Anil Parab on Kirit Somaiya : अनिल परब भडकले! म्हणाले, मला नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला समोर आणा; सोमय्यांविरोधात जाणार कोर्टात - Anil Parb got angry saying bring the MHADA officer

वांद्रे येथील शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाच्या पाडकामानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी थेट म्हाडा कार्यालय गाठत, सीईओंना धारेवर धरले. कार्यलयाशी माझा संबंध नसताना, नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला समोर आणा, अशी मागणी परब यांनी केली. दरम्यान, घोषणाबाजी करत गदारोळ करणाऱ्या सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Anil Parab
आमदार अनिल परब
author img

By

Published : Jan 31, 2023, 5:10 PM IST

Updated : Jan 31, 2023, 6:39 PM IST

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या वांद्रे पूर्वेकडील कार्यालयाचे पाडकाम केले. हे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमैया याठिकाणी पाहणी करणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमैया यांनी या ठिकाणी येऊन दाखवावे. शिवसैनिक त्यांचा योग्य तो पाहुणचार करतील, असे थेट आव्हान दिले आहे. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हाडा प्राधिकरणाच्या कार्यालयात धडकले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे म्हाडाचा परिसर दणाणून गेला आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना सोडण्याची मागणी केली. सीईओ बोरीकर यांनी परब यांची मागणी मान्य करत वादावर पडदा टाकला.

किरीट सोमय्यांविरोधात कोर्टात - म्हाडाने हे बांधकाम माझे नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझी बदनामी केल्याबद्दल आम्ही आधीच किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार आहेत. ते बांधकाम हाऊसिंग सोसायटीने केले होते आणि मी आमदार म्हणून ते कार्यालय वापरत होतो. ते नियमित करता येत नसल्याचे आढळून आल्यानंतर सोसायटीने स्वतःहून ते बांधकाम पाडले असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे.

  • The (illegal) construction was done by the housing society&I was using (office) as an MLA. Society demolished (illegal construction) on its own after it found that it can't be regularised: ShivSena's Anil Parab on MHADA issued him a demolition notice for his office in Bandra East pic.twitter.com/graii6r08L

    — ANI (@ANI) January 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तोपर्यंत मागे हटणार नाही : पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस दलाचा वापर केल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदार राहणार नाही, असे सांगितले. पोलिसांनी सामंजस्यांने शिवसैनिकांची मनधरणी करत म्हाडा प्राधिकरणाच्या आवाराच्या बाहेर काढले. परब यांनी म्हाडा प्राधिकरणाचे सीईओ मिलिंद बोरीकर यांची भेट घेत, म्हाडाच्या वसाहतीत असलेले जनसंपर्क कार्यालय माझ्याशी संबंधित आहे का, असा जाब विचारला. त्यावर बोरीकर यांनी नकार दिला. या घटनेमुळे परब यांनी बोरीकरांना चांगलेच फैलावर घेतले. मला नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीने समोर आणा, माझी बदमानी करण्यात आली आहे. जोपर्यंत त्याला समोर आणणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका परब यांनी घेतली.

नेमकं प्रकरण काय? : वांद्रे पूर्व येथील म्हाडा वसाहतीमध्ये अनिल परब यांचे जनसंपर्क कार्यालय होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर शिवसेना नेते अनिल परब यांचे वांद्रे येथील जनसंपर्क कार्यालयाचे पाडकाम केले. परब यांनी पत्रकार परिषद घेऊन, याबाबत भूमिका स्पष्ट केली. सन १९६० मध्ये म्हाडाच्या बिल्डिंग तयार झाल्या. येथील मी रहिवाशी आहे. माझे बालपण तसेच राजकीय कारकीर्द येथेच घडली. आजवर मला बदनाम करण्याचा प्रयत्न किरीट सोमैयांनी केला. मात्र, आज आमदार, माजी मंत्री म्हणून नव्हे तर एक रहिवाशी म्हणून बोलत आहे. म्हाडाच्या जागा आता सोसायटीच्या ताब्यात आहे. येथील रहिवाशांनी सांगितल्यामुळे येथे कार्यालय सुरु केले. परंतु, सोमैयांनी माझे कार्यालय अनधिकृत असल्याचे भासवत कारवाईची मागणी सातत्याने करत आहेत. सोसायटी मधील रहिवाशांनी परवानगी मागितली. सोमैयांनी वारंवार म्हाडावर दबाव टाकला, असा गंभीर आरोप परब यांनी केला. तसेच म्हाडाने सोसायटी अधिकृत करण्यास नकार दिल्यानंतर कार्यालयाचे पाडकाम केल्याचे परब यांनी सांगितले.

पोलिसांनी सोमैयांची गाडी अडवली : सोमय्या दुपारी 12.30 वाजता वांद्रे येथील अनिल परबांच्या पाडकाम केलेल्या कार्यालयाला भेट देणार होते. त्यासाठी सोमय्या घरातून निघाले. मात्र, अनिल परब यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वांद्रे येथील संबंधीत म्हाडाच्या वसाहतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी सोमय्यांची गाडी बीकेसी येथे अडवली. दरम्यान, गाडी अडवल्यामुळे सोमय्या संतप्त झाले. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. अखेर पोलिसांनी मनधरणी करत, सोमैयांना वांद्रे येथे जाण्यापासून रोखले.

हेही वाचा : ठाकरे गटातील नेत्यांची सुरक्षा कमी केल्याचे प्रकरण! राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश

Last Updated : Jan 31, 2023, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.