ETV Bharat / state

मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश द्यावा; अनिल गलगली यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - अनिल गलगली मुख्यमंत्री पत्र

सामान्य नागरिकांना विविध बाबींच्या तक्रारी करण्यासाठी किंवा अन्य पत्रव्यवहारासाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. प्रवेशद्वारावरच विभागात पत्र घेण्यासाठी कोणी कर्मचारी नसल्याची सबब पुढे करून माघारी पाठवले जाते. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

Mantralaya
मंत्रालय
author img

By

Published : Aug 19, 2020, 7:43 PM IST

मुंबई - मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोनाचे कारण सांगून सामान्य नागरिकांना आजही मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. आपले काम घेऊन गेलेल्या नागरिकांना प्रवेशद्वारावरुन परतवून लावले जात आहे, याबद्दल गलगली यांनी नाराजी व्यक्त केली.

मंत्रालयात सामान्य नागरिकांना प्रवेश द्यावा

अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, विशेष गृह सचिव अमिताभ गुप्ता यांना याबाबत पत्र पाठवून निवेदन दिले आहे. कोविड काळात मंत्रालयात अधिकारी-कर्मचारी नसल्याने प्रवेश दिला जात नव्हता. आता परिस्थिती वेगळी असून मंत्रालयात कर्मचारी उपस्थित आहेत. मात्र, सामान्य नागरिकांना विविध बाबींच्या तक्रारी करण्यासाठी किंवा अन्य पत्रव्यवहारासाठी मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही. प्रवेशद्वारावरच विभागात पत्र घेण्यासाठी कोणी कर्मचारी नसल्याची सबब पुढे करून माघारी पाठवले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना सरसकट प्रवेश दिला जात नाही, ही बाब योग्य आहे. मात्र, ज्या नागरिकांना पत्र देऊन सही व शिक्का घ्यायचा आहे, अशांची खातरजमा करून त्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. मंत्रालयात सामान्य नागरिकांना पत्रव्यवहार व रजिस्ट्रार विभागात नोंदणी करण्यासाठी प्रवेश देण्याबाबत सूचना जारी करण्यात याव्यात, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.