ETV Bharat / state

'ईडी'ने संपत्ती जप्त केल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - अनिल देशमुख व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच ईडीकडून अनिल देशमुखयांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Anil Deshmukh
'ईडी'ने संपत्ती जप्त केल्यानंतर अनिल देशमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
author img

By

Published : Jul 19, 2021, 3:27 PM IST

Updated : Jul 19, 2021, 4:14 PM IST

मुंबई - अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची सुमारे 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचे वरळीतील घर तसेच त्यांचा मुलगा सलील देशमुख यांनी 2006मध्ये उरण येथे घेतलेली जमीन आदींचा समावेश आहे. दरम्यान, आज अनिल देशमुख यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अनेक बाबींचा खुलासा केला आहे.

प्रतिक्रिया

काय म्हणाले अनिल देशमुख? -

माझी आणि माझ्या कुटुंबियांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती तात्पुरत्या स्वरूपात ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सलील देशमुख यांनी 2006मध्ये घेतलेल्या उरण इथल्या जमिनीचादेखील समावेश आहे. 2006मध्ये ही जमीन 2 कोटी 67 लाख रुपयांना सलील देशमुख यांच्या कंपनीने विकत घेतली होती. या जमिनीचा भाव काही प्रसारमाध्यमे 300 कोटी दाखवून एक संभ्रम निर्माण करत आहे‌. तसेच मला ईडीचा समन्स आला होता. या विरोधात मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचा जो काही निकाल येईल, त्यानुसार ईडीच्या चौकशीला सामोरे जाईल, असे अनिल देशमुख यांनी व्हिडीओत म्हटले आहे.

देशमुखांची 4.20 कोटींची संपत्ती ईडीने केली होती जप्त -

दरम्यान, 16 जुलै रोजी ईडीने अनिल देशमुख यांची 4.20 कोटींची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये वरळी येथील देशमुख यांचे घर आणि उरण इथल्या जमिनीचा समावेश होता. सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली होती. या बदलीनंतर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप लावण्यात आले होते. या लेटर बॉम्बनंतर अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपद देखील गेले होते. संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडीने आपल्या ताब्यात घेतला असून आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे.

हेही वाचा - कोरोनाची लस घेतलेले बाहुबली -मोदी, बोलताना स्वतः पकडली छत्री

Last Updated : Jul 19, 2021, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.