ETV Bharat / state

Tina Ambani ED Enquiry : फेमा प्रकरणी टीना अंबानी ईडीसमोर हजर; जाणून घ्या काय आहे प्रकरण

रिलायन्स एडीए ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची ईडीने सोमवारी चौकशी केली. त्यानंतर आता त्यांची पत्नी टीना अंबानी यादेखील आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ईडी कार्यालयात हजर झाल्या. त्यांचीही चौकशी करण्यात आली.

Anil Ambani Wife
अनिल अंबानींनंतर आता टीना अंबानी ईडीसमोर हजर
author img

By

Published : Jul 4, 2023, 7:02 PM IST

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या विरोधात परदेशी विनिमय कायद्याच्या विविध कलमांतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांचा जबाब नोंदवला. तसेच रिलायन्स एडीएजीचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी या परदेशी विनिमय कायद्याच्या उल्लंघनाच्या चौकशीच्या संदर्भात आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या. टीना अंबानी यांचे पती अनिल अंबानी यांचीही ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली होती.

ईडी चौकशी : फेमाच्या विविध कलमांतर्गत नोंदवण्यात आलेल्या आणखी एका प्रकरणात अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नीच्या अघोषित संसाधने आणि संबंधित मालमत्तांशी संबंधित परदेशातील मालकीबद्दल ईडी चौकशी करत आहे. अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष असलेल्या अनिल अंबानी यांचा नेमक्या कोणत्या प्रकरणात जबाब नोंदविण्यात आला याची माहिती उपलब्ध नसली तरी, फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका आयडीने त्यांच्यावर ठेवला आहे. यापूर्वीही 2020 मध्ये येस बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने अनिल अंबानी यांची चौकशी केली होती.

आयकर विभागाची नोटीस : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या अनिल अंबानी यांना, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आयकर विभागाने ही नोटीस धाडली होती. त्यांनी स्विस बँकेतील दोन खात्यात 814 कोटी रुपये ठेवले होते. तसेच त्यावर लागू असलेला 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा ठपका ठेवत काळ्या पैशांच्या कायद्यांतर्गत आयकर विभागाने त्यांना नोटीस बजावली होती.

2020 मध्ये येस बँकेच्या प्रकरणातही चौकशी झाली होती : 2020 मध्ये अनिल अंबानी येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हजर झाले होते. तसेच त्यावेळी अनिल अंबानी यांची 9 तास चौकशी करण्यात आली होती. अनिल अंबानी समूहाच्या 9 कंपन्यांनी यस बँकेकडून 12800 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

हेही वाचा -

  1. Anil Ambani : अनिल अंबानींच्या मागे चौकशीचा ससेमिरा, ED ने FEMA अंतर्गत नोंदवला जबाब
  2. Reliance : राज्य सरकारचा रिलायन्सला दणका; पाच विमानतळांचे संचालन करण्यात रिलायन्स अपयशी
  3. Anil Ambani : 28 एप्रिलपर्यंत अनिल अंबानींवर कोणतीही कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.