ETV Bharat / state

भाजपला सोडचिट्टी देणाऱ्यांची संख्या वाढली; अनिल कदम यांनी बांधले शिवबंधन

भारतीय जनता पक्षाला तीन धक्के दिल्यानंतर काल शिवसेनेने अजून एक प्रवेश घडवत भाजपला चौथा धक्का दिला. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक अनिल कदम आणि प्रेसिला कदम यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.

author img

By

Published : Feb 9, 2021, 1:43 AM IST

Anil Kadam joins Shiv Sena
अनिल कदम शिवसेना प्रवेश

मुंबई - भारतीय जनता पक्षातून शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला तीन धक्के दिल्यानंतर काल शिवसेनेने अजून एक प्रवेश घडवत भाजपला चौथा धक्का दिला. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कट्टर समर्थक अनिल कदम आणि प्रेसिला कदम यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला.

हेही वाचा - महाराष्ट्र : आज 2216 नवीन कोरोना रुग्णांची भर; 15 रुग्णांचा मृत्यू

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्के देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे, भाजपाला जोरदार धक्का बसला. आता त्या पाठोपाठ अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या प्रेसिला कदम, तसेच भाजप प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

कदम यांचा शिवसेना प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजप मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू झाली आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

हेही वाचा - मुंबईत ब्लास्ट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या युवकाला हरियाणामधून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.