मुंबई - अंधेरीतील गोखले पूल आजपासून प्रवाशांच्या रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये या पुलाचा काही भाग कोसळल्याने 2 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पादचारी, प्रवासी व अवजड वाहनांच्या रहदारीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता.
रेल्वेने आयआयटी सोबत केलेल्या संयुक्त पाहणीनंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून सदर पूल रहदारीसाठी बंद ठेवला होता. 3.3 मीटर रुंद असलेला जुना कंटीलेवर पूल तोडून त्या जागी नवीन स्टेलनेस स्टीलचे भाग बसविण्यात आले आहेत. या पुलाच्या नुतनीकरणासाठी एकूण 3.34 कोटी रुपये खर्च आला आहे.
या पुलाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले आहे. दक्षिणेकडील भाग जानेवारी 2019 मध्ये पूर्ण करण्यात आला. तर उत्तरेकडील पुलाचे काम 4 महिन्यात पूर्ण केल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.