मुंबई- अंधेरी न्यायालयाने अंधेरी पोलीस स्टेशनला अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल हिच्याविरोधात तबलीघी जमात पंथातील मुस्लीमांविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कंगनाने मुस्लीम समुदायाविरुद्ध द्वेषपूर्ण व अपमानास्पद टिप्पण्या केल्या असल्याचा एक व्हिडिओ दाखवत याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवर अवलंबून असलेला आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डवर उपलब्ध नाही. आरोप हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आरोपीने केलेल्या टीकेवर आधारित आहे. आरोपींविरुद्ध पुरावा इलेक्ट्रॉनिक स्वरुपाचा आहे. त्यामुळे, आरोपींविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी पोलिसांच्या हस्ते चौकशी होणे आवश्यक असल्याचे अंधेरी न्यायालयाने सांगितले.
मुंबईतील वकील अली काशिफ खान देशमुख यांनी कंगना आणि तिची बहीण रंगोलीविरुद्ध तक्रार दाखल करत त्यांच्यावर आक्षेपार्ह विधानांद्वारे आणि अवैध व्हिडिओद्वारे जातीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर न्यायालयाने आज सुनावणीत कंगना आणि तिची बहीण रंगोली हिच्यावरुद्ध चौकशीचे आदेश दिले.
हेही वाचा- 'केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात ३१ ऑक्टोबरला काँग्रेसचा राज्यव्यापी सत्याग्रह'