ETV Bharat / state

Stolen Sixteen Lakh : एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्याने लुटले सोळा लाख रुपये - Stolen Sixteen Lakh

पंढरपूर येथे एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यानेच सोळा लाख रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सीएमएम इन्फो सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ( Pandharpur Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मोहन दामाजी (रा. इसबावी), असे पैसे लुटलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

Pandharpur Police Station
Pandharpur Police Station
author img

By

Published : Mar 21, 2022, 3:21 PM IST

पंढरपूर ( सोलापूर ) - पंढरपूर येथे एटीएम मशीनमध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यानेच सोळा लाख रुपयांच्या रकमेवर हात साफ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सीएमएम इन्फो सिस्टीम लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ( Pandharpur Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मोहन दामाजी (रा. इसबावी), असे पैसे लुटलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पंढरपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेतील एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम सीएमएम इन्फो सिस्टिम लिमिटेड या कंपनीकडे आहे. पंढरपूर एसबीआय शाखेतून विविध एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी 36 लाख रुपये कंपनीचे कर्मचारी आशिष दामाजी व अन्य दोन जण घेऊन गेले होते. पंढरपूर उपनगरातील इसबावी येथे विसावा मंदिर जवळ एसबीआय बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये सोळा लाख रुपये भरणे गरजेचे होते. मात्र, त्यात 14 लाख भरण्यात आले.

कंपनीचे व्यवस्थापक सुहास कांबळे यांनी तपासणी करत असताना इसबावी येथील बँकेचे दोन लाख रुपये कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी आशिष दामाजी यास विचारणा केली असता. ही रक्कम दुसऱ्या एटीएममध्ये भरण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या एटीएममध्ये केवळ पाच लाख रुपये भरण्यात आले होते. सर्व गोष्टींची तपासणी केला असता आशिष दामाजी याने सोळा लाख अकरा हजार रुपयांची अफरातफर केल्याचे समोर आले. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - तरुण शेतकऱ्याचा देशी जुगाड, कल्पनाशक्तीतून साकारली ई - बाईक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.