ETV Bharat / state

प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी स्वायत्त संस्था स्थापन करण्याला मंजूरी

राज्यातील प्राध्यापकांच्या आणि प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन केली आहे. ही संस्था स्वायत्त असणार आहे. प्राध्यापक आणि प्राचार्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी सदस्यत्व शुल्क घेतले जाणार आहे

author img

By

Published : Jan 30, 2020, 8:28 AM IST

मंत्रालय
मंत्रालय

मुंबई - राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकांना(अध्यापकांना) आधुनिक शिक्षण पद्धतीच्या शिक्षणाविषयी माहिती देण्यात येणार आहे. शिक्षण पद्धतीमध्ये होणाऱ्या बदलांची माहिती देण्यासाठी स्वायत्त संस्थेची मदत घेतली जाणार आहे. अध्यापकांसाठी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.‍

राज्यातील बिगर कृषी विद्यापीठे आणि संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ज्या अधिव्याख्यात्यांनी 1 जानेवारी 1996 पूर्वी पीएचडी पूर्ण केली आहे, त्यांना 27 जुलै 1998 ऐवजी 1 जानेवारी 1996 पासून दोन आगाऊ वेतनवाढीला मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा - 'मोदींच्या ड्रीम टीमने संपूर्ण अर्थव्यवस्था बदलून टाकली'

राज्यातील प्राध्यापकांच्या आणि प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन केली आहे. ही संस्था स्वायत्त असणार आहे. यात राज्य सरकारचा 40 टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा 5 टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा 40 टक्के, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचा 5 टक्के, स्वयंसेवी संस्था आणि व्यवसाय संस्थांचा 10 टक्के सहभाग राहणार आहे.

प्राध्यापक आणि प्राचार्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी सदस्यत्व शुल्क घेतले जाणार आहे. कॉर्पोरेट आणि बिझनेस हाऊस यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा वेगळा 'कॉर्पस फंड' तयार करण्यात येणार आहे. ही प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालवण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल.

असे आहेत या संस्थेचे उद्देश....
• उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांना उद्योग, व्यवसाय व त्यांच्या संबंधीत क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती/तंत्रज्ञान यांनी समृद्ध करणे.
• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासून प्रशिक्षण पद्धतीमध्ये गरजेनुरुप बदल करणे.
• उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या, होणाऱ्या रोजगार संधीच्या आधारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून तसे बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.
• शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी शिकणे-शिकविण्याची पध्दती स्थापित करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास प्रोत्साहित करणे.
• शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधील व इतर राज्यांतील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करुन अद्ययावत तंत्रज्ञानाधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यास पद्धतींबाबत शासनास शिफारस करणे, सल्ला देणे.

Intro:स्वायत्त संस्थेकडून प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण : पुण्यात संस्था स्थापन करण्याचा घेतला मंत्रिमंडळाने निर्णय

mh-mum-01-cabinet-deci-teach-trani-7201153

मुंबई, ता. २९ :
राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील प्राचार्य आणि प्राध्यापकांना(अध्यापकांना) आधुनिक शिक्षण पद्धतीचे शिक्षण आणि त्यासाठीच्या बदलांची माहिती देण्यासाठी पुण्यात एक स्वायत्त संस्थेची मदत घेतली जाणार आहे. यासाठी अशी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.‍
यासोबतच राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ज्या अधिव्याख्यात्यांनी 1 जानेवारी 1996 पूर्वी पीएच.डी पूर्ण केली आहे, त्यांना 27 जुलै 1998 ऐवजी 1 जानेवारी 1996 पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील प्राध्यापकांच्या प्राचार्यांच्या प्रशिक्षणासाठी कंपनी कायद्यान्वये अध्यापक विकास संस्था स्थापन केली जाणार असून ही संस्था स्वायत्त असणार आहे. यात राज्य सरकारचा सहभाग 40 टक्के, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचा हिस्सा 5 टक्के, राज्यातील सर्व विद्यापीठांचा हिस्सा 40 टक्के, शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा हिस्सा 5 टक्के तसेच स्वयंसेवी संस्था व व्यवसाय संस्था यांचा हिस्सा 10 टक्के एवढा राहणार आहे.
ज्या प्राध्यापक आणि प्राचार्यांना या संस्थेकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्यासाठी सदस्यत्व शुल्क घेण्यात येणार असून कार्पोरेट व बिझनेस हाऊस यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा कॉर्पस फंड तयार करण्यात येणार आहे. . या प्रशिक्षण संस्थेचे कामकाज चालविण्यासाठी प्रशासकीय समिती स्थापन करण्यात येईल व मुख्य सचिव असणार आहेत.

असे आहेत या संस्थेचे उद्देश....

• उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील शिक्षकांना उद्योग, व्यवसाय व त्यांच्या संबंधीत क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान, शैक्षणिक पद्धती/तंत्रज्ञान यांनी समृद्ध करणे.
• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये झालेल्या बदलांच्या आधारे प्रशिक्षणाची परिणामकारकता तपासून प्रशिक्षण पद्धतीमध्ये गरजेनुरुप बदल करणे.
• उद्योग क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या, होणाऱ्या रोजगार संधीच्या आधारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विकसित करून तसे बदल अभ्यासक्रमामध्ये करण्यासाठी शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करणे.
• शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रभावी शिकणे-शिकविण्याची पध्दती स्थापित करणे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये संशोधनास प्रोत्साहित करणे.
• शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांमधील व इतर राज्यांतील शैक्षणिक पद्धतींचा अभ्यास करुन अद्ययावत तंत्रज्ञानाधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यास पद्धतींबाबत शासनास शिफारस करणे, सल्ला देणे.
Body:
mh-mum-01-cabinet-deci-teach-trani-7201153
यासाठी मंत्रालयाचे फाईल फुटेज वापरावेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.