ETV Bharat / state

Amruta Fadnavis Blackmail Controversy : 'हीच तुमची औकात'; अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटर वॉर

डिझायनर अनिक्षा जयसिंघानी लाच व धमकी प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व अमृता फडणवीस यांच्या ट्विटर वॉर रंगले आहे. प्रियंका चतुर्वैदी यांनेी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याप्रकरणी आरोपी अनिक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

amruta fadnavis reply to priyanka chaturvedi
अमृता फडणवीस प्रियंका चतुर्वेदी
author img

By

Published : Mar 16, 2023, 8:30 PM IST

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका डिझायनरने लाच तसेच ब्लॅकमेलिंग केली होती. याप्रकरणावरून आज विधानसभेत गदारोळ झाला. आता याप्रकरणावरून अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे.

  • I know ur औक़ात is about switching masters & pulling down honest & independent women.
    Why do u need to ask Miss चतुर pokey nose for an independent investigation-I’m myself demanding for it. Let the truth reg deceit come out to light along with real faces behind this treachery https://t.co/GbbmwsTl5R

    — AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया - चतुर्वेदी म्हणतात की, गुन्हेगाराच्या मुलीला प्रत्यक्ष उपमुख्यमंत्र्यांच्या घरात प्रवेश मिळतो आणि ती त्यांच्या पत्नीशी ५ वर्षांहून अधिक काळ मैत्री करते. ती डिझायनर अमृता फडणवीसांना दागिने, घालायला कपडे देते. तसेच गाडीत तिच्यासोबत फिरता. ती डिझायनर बुकींची तक्रार करून, त्यांच्यावर छापा टाकून पैसे कसे कमवू शकतात हे देखील अमृता फडणवीस यांना सांगते. तरीही त्या दोघींची मैत्री कायम आहे. आता व्हिडिओ आणि ब्लॅकमेलचे आरोप केले जात आहेत.

अमृता फडणवीस यांचे उत्तर - मी Axis बँकेला फायदा करून दिल्याचा आरोप याआधी प्रियंका चतुर्वेदी यांनी माझ्यावर केला होता. आता हा दुसरा विषय काढून, तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देत आहात का?, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच खरा चेहरा जनतेसमोर येईल, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

काय आहे नेमका मुद्दा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी एका डिझायनरविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. फडणवीस यांच्या तक्रारीवरून मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला.अनिक्षा जयसिंघानी असे आरोपी डिझायनरचे नाव आहे. डिझायनर अनिक्षा ही अमृता यांना व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट्स, मेसेज पाठवून धमकावत होती. अनिक्षा ही प्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीयांची मुलगी असून, अनिल मागील आठ वर्षापासून फरार आहे. बुकींना कसे धमकवायचे, त्यांच्यावर छापे टाकून पैसे उकळण्याची ऑफर अनिक्षाने अमृता यांना दिली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांना सांगून अनिक्षाचे वडील अनिल यांना सोडवण्यासाठीही अनिक्षाने अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचे समोर आले आहे. सध्या अनिक्षाला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा - Amruta Fadnavis Blackmail Case : अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणारी अनिक्षा अटकेत; कोण आहे अनिल जयसिंघानी?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.