ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: साहेब सांगतील तेच धोरण, अमोल कोल्हेंची स्पष्टोक्ती, २४ तासाच्या आत शरद पवारांच्या गोटात पुन्हा दाखल - महाराष्ट्रातील राजकीय वाद

अजित पवार यांनी उगारलेल्या बंडाच्या झेंड्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. (NCP Political Crisis) राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत, असे सांगितले जात असले तरी काही निष्ठावंतांनी अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP MP Amol Kolhe) अध्यक्ष शरद पवार यांच्या ठायी निष्ठा असल्याचे व्यक्त केली आहे. (Maharashtra Political Crisis) यापैकीच एक असलेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे होय. (Amol Kolhe policy about Sharad Pawar) अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सविस्तर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले आहे.

Maharashtra Political Crisis
अमोल कोल्हे
author img

By

Published : Jul 3, 2023, 6:23 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काल रविवारी दुपारी पडलेल्या फुटीमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. (NCP Political Crisis) अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली (NCP MP Amol Kolhe) असून खुद्द अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. (Maharashtra Political Crisis) यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. (Amol Kolhe policy about Sharad Pawar) मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोल्हेंचे ते ट्विट ठरले महत्त्वाचे: अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ९ आमदारांचा रविवारी दुपारी शपथविधी पार पडला. या शपथविधीला खुद्द अमोल कोल्हे उपस्थित होते. एवढेच नाही, तर कार्यक्रमानंतर अमोल कोल्हेंचा सुधीर मुनगंटीवार यांच्या पाया पडतानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सहभागी झाल्याचे बोलले जात होते. अजित पवारांनीही सगळ्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र, आज अमोल कोल्हेंनी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे ट्वीट करून स्वत:ची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे? “जब दिल और दिमाग में जंग हो, तो दिल की सुनो. शायत दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है. पर दिल कभी नहीं. मी साहेबांसोबत”, अशा सूचक शब्दांत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शपथविधीची कल्पनाच नव्हती : शपथविधीबाबत आपल्याला माहिती नव्हती, असा दावा अमोल कोल्हेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. “मी शरद पवारांसोबतच आहे. मी त्यांना भेटून सविस्तर प्रतिक्रिया देईन. मी काल एका वेगळ्या कामासाठी भेटायला गेलो होतो. मला शपथविधीची कल्पना नव्हती”, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

त्या व्हिडीओमध्ये नेमके काय? : अमोल कोल्हेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आधी त्यांनी माध्यमांना काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेतील “साहेब सांगतील ते धोरण, साहेब बांधतील ते तोरण”, हे वाक्य आहे. त्यापुढे लगेच पडद्यावरील त्यांच्या एका संवादातील वाक्य आहेत. “इथे सगळं विसरायचं, पण बाप नाही विसरायचा. त्याला भेटल्यानं, जवळ बसल्यानं, मायेनं विचारपूस केल्यानं तो कणसाळतो, कोंबारतो. त्याला नाही विसरायचं. त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये आपण सुख होऊन वाहायचं”, असे अमोल कोल्हेंनी संवाद या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष, प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती
  2. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडाचे ईडी कारवाई हे कारण नाही - शरद पवार
  3. Maharashtra Political Crisis: शरद पवार यांनी जे पेरले तेच उगवले प्रकाश महाजन...!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.