मुंबई - शहर व उपनगरातील तलावांमध्ये ‘हल्ला करणारा अमीबा’ म्हणजेच 'महाकाय विषाणू' असल्याचे पवई येथील आयआयटी मुंबई या संस्थेतील संशोधक टीमने संशोधन करून स्पष्ट केले आहे. प्राध्यापक किरण कोंडाबागील आणि त्यांच्या गटाने केलेल्या संशोधनानंतर जलाशयामध्ये या विषाणूंचे अस्तित्व असल्याची नोंद झाली आहे. हे विषाणू इतर विषाणूंपेक्षा खूप जास्त वेगाने मोठे होत असले तरी त्यापासून फार मोठा धोका नसल्याचाही दावा या संशोधकांनी केला आहे.
मुंबई शहर व उपनगरात पाणी अशुद्ध असल्याचा दावा नुकताच एका संशोधनात करण्यात आला होता. मात्र मुंबईतील जे तलाव आहेत त्यातील पाणी किती अशुद्ध आहे याचा अभ्यास आयआयटीच्या संशोधकांनी केला त्यावेळेस त्यांना महाकाय विषाणू आढळून आले. जलाशयांमधील असंख्य व मोठ्या विषाणूंनी बनविलेली ‘प्रथिने’ पाहून संशोधकही अवाक् झाले आहेत. ते विषाणू कोणावरही विसंबून न राहता स्वत:च प्रथिनांची निर्मिती करतात, असेही अभ्यासात निदर्शनास आले आहे.
खरं तर विषाणू हे सर्वात लहान आणि अत्यंत प्राचीन प्राणी आहेत. पृथ्वीवर जवळजवळ सर्वत्र व माती, झाडे, पाणी आणि प्राण्यांमध्येही हा विषाणू आढळतो. एखाद्यावेळेस ते इतर सूक्ष्मजंतू जसे बॅक्टेरिया आणि बुरशीमध्येही आढळतात. अनेक विषाणूंमुळे मानवाला आजार उद्भवतात, परंतु इंग्लंडमध्ये १९९२ साली सापडलेल्यापैकी बरेच विषाणू माणसासाठी निरुपद्रवी आहेत, असेही सिद्ध झाले आहे.
पवई येथील ‘आयआयटी मुंबई’ या संस्थेमधील संशोधक प्रा. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या गटाने केलेल्या संशोधनानंतर मुंबईतील जलाशयांमध्ये ‘महाकाय’ विषाणूंचे अस्तित्व असल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्व सजीवांप्रमाणेच, विषाणूंमध्येदेखील ‘जनुके’ असतात. त्यातून आवश्यक ती प्रथिने बनवून ते मनुष्य जीवन टिकवण्यासाठी महत्वाची असतात. विषाणूंचे आकार विभिन्न असतात. संशोधकांना समुद्र, तलाव, वनजाती आणि मानवी आतडे अशा विविध वातावरणातही ‘महाकाय विषाणू’ आढळले असल्याचा असा अंदाज आहे. मात्र, हे विषाणू ‘इको सिस्टीम’ राखण्यासाठी योगदान देतात.
संशोधन करताना जेव्हा प्रथम या महाकाय विषाणूचा शोध लागला तेव्हा वेगळ्या ‘केस’चा विचार केला गेला. पण, पुढे हे विषाणू जवळजवळ सर्व प्रकारच्या वातावरणात सर्वत्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे अभ्यासातून दिसून आल्याचे प्रा. कोंडाबागील यांनी सांगितले. हे विषाणू सर्व प्रकारच्या वातावरणातही आढळत असल्याचे भारतातील आणि इतर अभ्यासातील निष्कर्षावरून दिसून येते. ‘अमीबा’सारख्या दिसणाऱ्या ‘प्रोटीझोआ आणि प्लँकटन’सारख्या जीवांशी ते संबंधित आहेत.
हेही वाचा - डेपोतील काही जागा भाडेतत्वावर देऊन महसूल वाढवा - सुजाता पाटेकर
महाकाय अमिबांची (व्हायरस) रहस्यमय उत्क्रांती आणि मूळ समजून घेण्यासाठी प्रा. कोंडाबागील यांनी त्यांच्या सहकाऱयांसह हे संशोधन केले आहे. हे संशोधन वैज्ञानिक अहवालांच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले असून, भारतातून महाकाय विषाणूंवर झालेले हे पहिलेच संशोधन आहे. ‘जैव तंत्रज्ञान विभाग’(डीबीटी) आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग’ (डीएसटी), 'नोव्होझाईम्स अँड हॉल्क लार्सन फाऊंडेशन' यांनी या संशोधनाकरीता निधी दिला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - कांद्याचे दर वाढल्याने अनेकांच्या मेनू कार्डमधून 'कांदा भजी' गायब