मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांना पुन्हा एकदा नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्रीही नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते.
कालच्या तपासणीनंतर आज पुन्हा एकदा बच्चन कुटुंबीय नानावटीबाहेर उपस्थित होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. बिग बी यांना लिव्हरचा आजार जडला आहे. बच्चन कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी ही त्यांची सामान्य तपासणी असल्याचे सांगितले आहे. मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आजार गंभीर झाल्याने आज त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.