मुंबई Amit Shah in Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मुंबईत आले होते. अमित शाह यांच्या बहिणीवर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या बहिणीची विचारपूस करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह थेट मुंबईत दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बहिणीची भेट घेतली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा रुग्णालयात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनीही शाह यांच्या बहिणीच्या प्रकृतीची विचारपूस केली. अमित शाह सुमारे पावणे दोन तास मुंबईत होते. अमित शाह मुंबईत आल्याचं कळताच रुग्णालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तसंच अमित शाह आल्याची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही रुग्णालयात धाव घेतली होती.
पुर्णपणे खासगी दौरा : गृहमंत्री अमित शाह यांचा हा खासगी दौरा होता. या भेटीनंतर शाह पुन्हा थेट दिल्लीला निघाले. त्यांनी या दौऱ्यात कुणाचीही भेट घेतली नाही. कोणतीही बैठक घेतली नाही. आपल्या बहिणीची विचारपूस करुन ते थेट दिल्लीला रवाना झाले. शाह यांचा हा पूर्णपणे खासगी दौरा असल्यानं भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना किंवा नेत्यांना याची माहिती देण्यात आली नव्हती.
PACS मेगा कॉन्क्लेव्हचं आयोजन, अमित शाह भुषवणार अध्यक्षपद : देशात प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) जन औषधी केंद्रे म्हणून कार्यरत आहेत. आज राष्ट्रीय राजधानीत राष्ट्रीय PACS मेगा कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलंय. सहकार मंत्री अमित शाह हे या कॉन्क्लेव्हचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. सहकार मंत्रालयानं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या सहकार्यानं या कॉन्क्लेव्हचं आयोजन केलंय. सहकार मंत्रालयानं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) च्या सहकार्यानं विज्ञान भवन येथे आयोजित केलेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये केंद्र आणि राज्याचे अनेक अधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
हेही वाचा :