मुंबई : गृहमंत्री अमित शाह आपल्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी शनिवारी (15 एप्रिल) मुंबईत आले आहेत. या दौऱ्यात शाह भाजपच्या विविध नेत्यांच्या बैठका घेऊन राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेणार आहेत. आपल्या या दौऱ्यात गृहमंत्री अमित शाह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकही होणार आहे.
-
Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis received Union Home Minister Amit Shah in Mumbai. pic.twitter.com/PTP3BcTkr9
— ANI (@ANI) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis received Union Home Minister Amit Shah in Mumbai. pic.twitter.com/PTP3BcTkr9
— ANI (@ANI) April 15, 2023Maharashtra CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis received Union Home Minister Amit Shah in Mumbai. pic.twitter.com/PTP3BcTkr9
— ANI (@ANI) April 15, 2023
मातोश्रीबाहेर बॅनरबाजी - केंद्रीय मंत्री अमित शहा दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुंबईभर मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे - फडणवीस सरकारकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानाबाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले आहेत. राज्यात झालेल्या नाट्यमय सत्तांतरानंतर अमित शहा यांचा हा चौथा महाराष्ट्र दौरा असून, मुंबईत ते दुसऱ्यांदा येत आहेत. अमित शहा यांचे मोठमोठे होर्डिंग मुंबईभर लावण्यात आले असून त्या होर्डिंग्जवर अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते आनंद दिघे व त्याचबरोबर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे फोटो आहेत.
चंद्रकांत पाटील मात्र दौऱ्यात नाहीत - मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद मुद्द्यावरून बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर आरोप केले होते. या त्यांच्या विधानावरुन अमित शाह नाराज असल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह मुंबईत असताना चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापुरात असल्याची बातमी आहे.
-
#WATCH | Maharashtra: Union Home Minister Amit Shah arrives in Mumbai. pic.twitter.com/uVXLjYQaCp
— ANI (@ANI) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra: Union Home Minister Amit Shah arrives in Mumbai. pic.twitter.com/uVXLjYQaCp
— ANI (@ANI) April 15, 2023#WATCH | Maharashtra: Union Home Minister Amit Shah arrives in Mumbai. pic.twitter.com/uVXLjYQaCp
— ANI (@ANI) April 15, 2023
शाहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार : उद्या नवी मुंबईतील खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावणार आहेत. यावेळी अमित शाहंच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्थक येण्याची शक्यता आहे. अमित शाहंच्या या दौऱ्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे. त्यामुळेच त्यांच्या या दौऱ्यासाठी भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे.
महापालिका निवडणुकासाठी रणनीती आखणार : अमित शाहंचा आजचा मुक्काम सह्याद्री अतिथीगृहावर असणार आहे. तेथे ते भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत अमित शाह राज्यातील मिशन 45 आणि आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांचा आढावा घेणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपची स्थिती कशी आहे, तसेच मुंबई महानगर पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईत कसे वातावरण आहे, याचा आढावा देखील अमित शहा या बैठकीत घेणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शाहंचा हा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. या दौऱ्यामार्फत अमित शाह मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखणार आहेत.
हेही वाचा : Aditya Thackeray : कांजूरमधील ती 15 हेक्टर जागा नेमकी कुणाची; आदित्य ठाकरे यांचा सवाल