ETV Bharat / state

मातोश्रीची पायरी न चढताच अमित शाह दिल्लीला रवाना

लोकसभा निवडणुकीवेळी एनडीएच्या मोठ्या घटक पक्षात भाजपने शिवसेनेला सोबत घेण्यासाठी अमित शाह यांना मातोश्री दरबारी पाठवले. त्यावेळी 3 तास सुरू असलेल्या चर्चेनंतर युतीची अधिकृत घोषणा अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.

अमित शाह
author img

By

Published : Sep 22, 2019, 4:08 PM IST

मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपाच्या चर्चेत मध्यस्थी करुन युतीवर शिक्कामोर्तब करतील का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र, अमित शहा यांनी मातोश्रीवर न जाता परस्पर दिल्ली गाठली. त्यामुळे युतीवरून पुन्हा अस्पष्टता असल्याचे दिसून आले.

हेही वाचा - भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?

लोकसभा निवडणुकीवेळी एनडीएच्या मोठया घटक पक्षात भाजपने शिवसेनेला सोबत घेण्यासाठी अमित शाह यांना मातोश्री दरबारी पाठवले. त्यावेळी 3 तास सुरू असलेल्या चर्चेनंतर युतीची अधिकृत घोषणा अमित शाह यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मात्र, आता राजकिय परिस्थिती बदलली आहे. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यावर भाजपचा आगामी निवडणुका जिंकण्याचा विश्वास दांडगा झाला आहे.

हेही वाचा - आघाडीचं ठरलं, युतीचं काय...?

त्यात अमित शाह आता केंद्रीय गृहमंत्री पदावर विराजमान आहेत. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार आमचं ठरलंय. युतीची घोषणा अमित शाह, मी आणि मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, आज अमित शाह मुंबईत 370 कलम रद्द करण्याच्या मुद्द्यांवर व्याख्यान देण्यासाठी आले असताना, मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता होती. मात्र, शाह थेट दिल्लीला निघून गेल्याने युती होणार की नाही? आणि झाल्यास केव्हा होईल? असे प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.

Intro:मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजच्या मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपाच्या चर्चेत मध्यस्थी करुन युतीवर शिक्कामोर्तब करतील का याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र अमित शहा यांनी मातोश्रीवर न जाता परस्पर दिल्ली गाठली. यामुळे युतीवरून पुन्हा अस्पष्टता असल्याचे दिसून आले.Body:लोकसभा निवडणुकीवेळी एनडीएच्या मोठया घटक पक्षात भाजपने शिवसेनेला सोबत घेण्यासाठी अमित शहा यांना मातोश्री दरबारी पाठवले. त्यावेळी 3 तास सुरू असलेल्या चर्चेनंतर युतीची अधिकृत घोषणा अमित शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आली. मात्र आता राजकिय परिस्थिती बदलली आहे. जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यावर भाजपचा आगामी निवडणुका या मुद्द्यावर जिंकण्याचा विश्वास दांडगा झाला आहे.
त्यात अमित शहा आता केंद्रीय गृहमंत्री पदावर विराजमान आहेत. Conclusion:एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारंवार आमचं ठरलंय. युतीची घोषणा अमित शहा, मी आणि मुख्यमंत्री घेतील असे पत्रकार परिषदेत सांगत आहेत. मात्र आज अमित शहा मुंबईत 370 कलम रद्द करण्याच्या मुद्द्यांवर व्याख्यान देण्यासाठी आले असताना, मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची भेट घेतील अशी शक्यता होती. मात्र शहा थेट दिल्लीला निघून गेल्याने युती होणार की नाही आणि झाल्यास केव्हा होईल असे प्रश्न अनुत्तरित राहिलेय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.