मुंबई - केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची आज नवापूर, अकोला, कर्जत-जामखेड येथे सभा आहेत. तर तर शरद पवार यांची बारमती, इंदापूर, कर्जत-जामखेड, कोपूरहोळ आणि भोर येथे प्रचारसभा आहे. आज (शनिवार) प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच बड्या नेत्यांच्या राज्यभर सभा आहेत.
हेही वाचा - अजूनही मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता; बंडखोर उमेदवार धनराज मुंगळेंचे वक्तव्य
रायगडमधील माणगाव, श्रीवर्धन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा आहे. सायंकाळी ५ वाजता प्रचाराची तोफ थंडावणार आहे. प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने दिग्गज नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल बोला.. कलम 370 नाही तर 371 बद्दल बोला - अशोक चव्हाण
काल (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसामध्ये सभा घेतली. भाजप शिवसेना यूती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचाार सुरू आहे. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी विकास कामांच्या घोषणा करण्यात येत आहे.