मुंबई - द परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेला आमिर खान (Aamir Khan divorce) आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव (Kiran Rao divorce) यांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट टाकून त्यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांच्या या घटस्फोटामुळे १५ वर्षांचे असलेली त्यांचे सहजीवन संपलेले आहे.
या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आमिर खानचे (Aamir Khan divorce) हे दुसरे लग्न असून त्यांना आझान नावाचा लहान मुलगाही आहे. घटस्फोट घेतला असला तरीही आझानचा सांभाळ दोघेही एकत्र करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
घटस्फोट ही नवीन जीवनाची सुरूवात
या १५ वर्षांच्या एकत्र प्रवासात आम्ही जीवनाचे आनंद, दु:ख असे अनेक अनुभव घेतले. या कालावधीत आमची मैत्री विश्वास, प्रेम आणि आदर या तीन गोंष्टींमुळे नाते बहरत गेले. आता आम्ही आमच्या जीवनाच्या नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहोत. पती पत्नी नाही तर पालक म्हणून. आम्ही खूप आधीपासून वेगळे होण्याचा विचार करत होतो. आता आम्ही वेगळे राहू मात्र, आम्ही एकत्रच जीवन जगू. आम्ही एकत्रित आझानचा सांभाळ करणार आहोत. याशिवाय आम्ही आता पानी फाऊंडेशन तसेच इतर चित्रपटांच्या निर्मितीतही एकत्र काम करू. माझ्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे आभार. ज्यांनी आमची ही परिस्थिती समजून घेतली. आम्ही त्यांच्याशिवाय हा निर्णय घेऊ शकलो नसतो. मी तुम्हा सर्वांना सांगू ईच्छितो,की घटस्फोट हा शेवट नसून नवीन जीवनाची सुरुवात आहे.
तुमचेच,
आमिर आणि किरण
लगानच्या सेटवर झाली मैत्री
आशुतोषच्या 'लगान' या चित्रपटात काम करताना किरण ही असिस्टंट डायरेक्टर होती. तेव्हा त्यांची ओळख झाली. आमिरचा त्याच्या पत्नीशी घटस्फोट झाल्यावर आमिर-किरणची मैत्री वाढली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी दीड वर्ष एकत्र राहित्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत आमिरने किरणशिवाय माझे जीवन व्यर्थच आहे, असेही सांगितले होते.
हेही वाचा - Raju sapate suicide : कलादिग्दर्शक राजेश सापते यांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी व्हिडिओ व्हायरल