ETV Bharat / state

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा! ऑल कुर्ला कमिटीकडून गरजूंना ऑक्सिजन वाटप - ऑल कुर्ला कमिटी ऑक्सिजन पुरवठा बातमी

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडादेखील वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑल कुर्ला कमिटीकडून गरीब व गरजू नागरिकांना अल्प दरात तर काहींना मोफत ऑक्सिजन दिले जात आहे.

Mumbai Oxygen News
मुंबई ऑक्सिजन साठा बातमी
author img

By

Published : Apr 17, 2021, 10:44 AM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याचे दिसत आहे. औषधे, बेड, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा, ऑक्सिजन यांसारख्या सुविधांची अनेक ठिकाणी वानवा दिसून येत आहे. राज्यात ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा अल्प आहे. त्यामुळे खासगी कंपन्या अव्वाच्या सव्वा दरामध्ये ऑक्सिजन देत आहेत. मात्र, असे असताना ऑल कुर्ला कमिटीकडून गरीब व गरजू नागरिकांना अल्प दरात तर काहींना मोफत ऑक्सिजन दिले जात आहे.

ऑल कुर्ला कमिटीकडून गरजूंना ऑक्सिजन वाटप केले जात आहे

खासगी कंपन्यांकडून नागरिकांची लूट -

तुटवडा पाहता खासगी कंपन्या नागरिकांची लूट करत आहेत. फ्लो मीटरची मार्केटमध्ये किंमत साधारण तीन हजार ते साडे तीन हजार रुपये आहे. मात्र, ऑल कुर्ला कमिटी हे मीटर फक्त 2 हजार रूपयांमध्ये उपलब्ध करत आहे. तसेच दोन किलो ऑक्सिजन सिलेंडरची मार्केटमध्ये किंमत सहाशे ते सातशे रुपये आहे. ऑल कुर्ला कमिटी फक्त 400 रुपयात ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहे.

या संस्थेकडून पहिल्या लाटेत मोफत सुविधा देण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने बाजारातील किमतींपेक्षा कमीत कमी दराने हे ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत. सध्या आपण १०० पैकी फक्त १० लोकांची गरज भागवू शकत असल्याची खंत या संस्थेच्या सदस्यांनी बोलून दाखवली. भविष्यात अधिक पुरवठा करणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.