ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. यात मोठी गर्दी होत असल्याने, पश्चिम रेल्वेने लोकल गाड्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला ३०५ लोकल डण्यात येत होत्या. ती संख्या आता ५०० वर करण्यात आली आहे.

Amid Covid-19 outbreak, Western Railway to increase Mumbai local services to 500
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतला 'हा' निर्णय
author img

By

Published : Sep 19, 2020, 12:23 PM IST

मुंबई - सर्व सामन्यांसाठी लोकल सेवेची दारे बंद आहेत. पण, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल सेवेमुळे मोठा आधार मिळत आहे. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ३५० विशेष लोकल चालवल्या जात आहे. पण त्यातही मोठी गर्दी होत असल्याने आता आणखी गाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई शहरात पश्चिम रेल्वेकडून अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी सद्या 350 गाड्या चालवल्या जात आहेत. हळूहळू महाराष्ट्रात लॉकडाउन शिथिल करत कार्यालयातील स्टाफ वाढवण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आता 500 गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने विभागाकडून घेण्यात आला आहे. लॉकडाउन काळात सुरुवातीला प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कमी होती. मात्र ती हळूहळू वाढ गेली आहे. त्यामुळे रेल्वेत सामाजिक अंतर कायम ठेवण्यासाठी आणि जास्त गर्दी टाळण्यासाठी, पश्चिम रेल्वेने आणखी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला.

सोमवार (२१ सप्टेंबर ) पासून 350 वरून 500 पर्यंत गाड्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे आता 150 अधिक लोकल गाड्या सोडण्यात येणार आहेत. वाढीव सेवांपैकी सकाळी 30 रेल्वे, कार्यालयीन वेळी 30 आणि संध्याकाळी 29 रेल्वे तसेच गरजेनुसार अधिक रेल्वे गाड्या आता सोडण्यात येणार आहेत, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले.

तसेच रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना सामाजिक अंतरांचे नियम पाळावेत व मास्क वापरावा. महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्यानुसार अनिवार्य प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणीही प्रवास करु नये. या अधिक रेल्वे सेवेचे वेळापत्रक देखील लवकरात लवकर सर्वांपर्यंत सामायिक केले जाईल, असे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा - अंधेरी, गोरेगाव परिसरात २२, २३ सप्टेंबरला पाणीकपात, जाणून घ्या कारण...

हेही वाचा - शाळा प्रवेशाच्या वयासाठी पुन्हा अडवणूक? आता डिसेंबरपर्यंत आणली मर्यादा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.